कर्मवीर शंकरराव काळे कारखाना उसाला  २५०० रुपये भाव; तर कामगारांना १८ टक्के   बोनस देणार – आ. आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना उसाला  २५०० रुपये भाव; तर कामगारांना १८ टक्के   बोनस देणार – आ. आशुतोष काळे

Karmaveer Shankarrao kale factory price of sugarcane Rs. 2500; Workers will be given bonus  18%  – MLA Ashutosh Kale

६७ गळीत हंगाम शुभारंभ; ७ लाख मेट्रिक टन गाळपचे उद्दिष्ट

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 25 Oct 2021,16:18Pm.

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे कारखाना उसाला  २५०० रुपये भाव; तर कामगारांना १८ टक्के   बोनस देणार ७ लाख मेट्रिक टन गाळपचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी ६७ गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी बोलताना दिली.

कर्मवीर शंकरराव काळे  सहकारी साखर कारखान्याचा ६७ वा गळीत हंगाम शुभारंभ सोमवारी दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. माजी आमदार अशोक काळे व सौ. पुष्पाताई काळे यांचे हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न झाला आहे.

 कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी  यावेळी बोलतांना मांडलेले काही ठळक मुद्दे

ब्राझील व  थायलंड येथे दुष्काळ असल्याने भारताला साखर निर्यात करण्याची मोठी संधी आहे, साखरेचे जादा उत्पादन होऊनही केवळ  निर्यातीवर व  इथेनाईल निर्मितीवर भर दिल्याने  शिल्लक साठा नियंत्रित ठेवण्यास मदत झाली, त्यामुळे आर्थिक नियोजन करताना व्यावसायिक दृष्ट्या जगात होणारे बदल सकारात्मक घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज आहे, सहकार हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असून घटनेनुसार सहकार खात्याचे कायदे बनविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. सहकार क्षेत्रासाठी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र खात्याची स्थापना केली असून या खात्याकडून सहकारी संस्था बळकट व सक्षम  करण्याचा हेतू अभिप्रेत आहे, केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन सहकार खात्याचा वापर सरकारच्या इतर एजन्सी प्रमाणे राजकारणासाठी होऊ नये हीच अपेक्षाआहे तर  सहकाराबाबत चांगले सकारात्मक धोरण  ठेवून काम झाले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे, आय कराचा प्रश्न जुना आहे याबाबत निराकरण व अंमलबजावणी होऊन सोडवणूक करावी अशी विनंती त्यांनी केली गुजरात प्रमाणे एफ आर पी ची रक्कम तीन हप्त्यांत देण्याची तरतूद आहे त्यामुळे साखर विकून पेमेंट उपलब्ध होत असल्याने कर्ज घेण्याची व व्याज भरण्याची पाळी येत नाही त्यामुळे उत्पादकांना योग्य दर देता येतो परंतु  तीन टप्प्यात पैसे देण्याबाबत अनेक कारखान्यांनी गैरफायदा घेतल्यामुळे शेतकरी तयार नव्हते त्यामुळे विनंती करतो की, वेळेवर शेतकऱ्याचे ऊस उत्पादकाचे पेमेंट द्या, काळजी घ्या, ब्राझील आणि थायलंडमधील दुष्काळ विचारात घेऊन ४० ते ६० लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा भासणार असून निर्यातीची मोठी संधी आहे साखर विक्री करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर विचारात घेऊन घेऊ जगात भारतातील साखरेचा सर्वोच्च दर असतो याचे कारण ऊसाला आपण जास्त दर देतो खर्च वाढतो स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला हेक्टरी उत्पादन  वाढविले तरच नफा मिळेल, सरकारने पन्नास रुपयाची एफआरपी वाढली असली तरी डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे हे पैसे वाहतुकीसाठी खर्च होणार असल्यामुळे उत्पादकांना याचा फारसा फायदा होईल असे वाटत नाही, तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता २५०० रुपये उसाला भाव देण्याचे यांनी जाहीर केले. लॉकडाऊन मुळे साखर विक्री व उपपदार्थ विक्रीवर परिणाम झाल्याने दिवाळी देऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त केली. कार्यक्षेत्रात जादा ऊस असल्यामुळे बाहेरील पाहुण्यांचा ऊस या वर्षी घेता येणार नाही, कारखान्याची मशिनरी साठ वर्षाची जुनी झाली,  अत्याधुनिक मशिनरी  पुढील हंगामात बॉयलर  व मिल सुरू करकरून सहा ते साडेसात हजार दररोजचे गाळप उद्दिष्ट ठेवू त्यामुळे पाहुण्यांचा ऊस घेऊन त्यांची नाराजी दूर करता येईल,   

आ. आशुतोष काळे यांनी केलेले टोलेबाजी,

विरोधात असतानाही माजी आमदार अशोक काळे यांनी मतदारसंघात मोठा निधी  आणून भरपूर कामे केली मग सत्ताधारी आमदार किती निधी आणू शकतो परंतु सत्ता असूनही त्यांना कामे करता आली नाही. मला माझ्या वडिलांप्रमाणे केलेल्या कामाचे मार्केटिंग करता येत नाही, परंतु  काहीच न करता जर काही लोक मोक्कार प्रसिद्धी घेत असतील तर मग मला मी केलेले कामे सांगावीच लागेल, गेल्या दोन वर्षात दीड वर्ष कोरोना होता, आताशी परिस्थिती सुरळीत होत आहे, निवडून येता शहराच्या पाणी प्रश्नासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू केले तरीही मी जास्तीत जास्त निधी आणला, रस्ते,पाणी,वीज ७५२ महामार्ग साठी निधी तसेच १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, ऑक्सीजन प्लांट हे मूलभूत प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. येणाऱ्या तीन वर्षाच्या कालावधीत सर्वच नाही परंतु जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू  कामगारांना १२ टक्के वेतनवाढ दिली तसा बोनसही मागच्या वर्षीप्रमाणे देऊ अशी घोषणा आमदार काळे यांनी  शेवटी केली.  कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधाकर रोहोम,  संचालक पद्माकर कुदळे एम.टी रोहमारे, छबुराव आव्हाड, नारायणराव मांजरे, संभाजी काळे,  सौ पौर्णिमा जगधने राहुल रोहमारे अनिल कदम यासह कर्मवीर काळे कारखाना उद्योग समूहाचे विविध शाखांचे संचालक पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते  सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन सुधाकर रोहम यांनी मानले.         

Leave a Reply

You cannot copy content of this page