सहकारमहर्षि कोल्हे कारखाना साखर उता-यात सर्वात टॉपचा कारखाना म्हणून गणला जाईल- बिपीन कोल्हे

सहकारमहर्षि कोल्हे कारखाना साखर उता-यात सर्वात टॉपचा कारखाना म्हणून गणला जाईल- बिपीन कोल्हे

Sahakar Maharshi kolhe Factory will be considered as the top factory in Sugarcane – Bipin  kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 26 Oct 2021,16:18Pm.

 ठळक मुद्दे – ५९ गळीत हंगाम शुभारंभ; उसाला २५०० रुपये भाव व कामगारांना १८ टक्के बोनस, ८.२५ लाख मे. टनाचे उदिष्ट, कारखान्याची साप्ताहिक सुट्टी सोमवार ऐवजी रविवारी सुट्टी, उपपदार्थ निर्मीतीवर मुख्य भर देवुन साखर हे बाय प्रॉडक्ट ठेवणार आहे. कामगार व वाहतूकदारांना स्मार्ट कार्ड देणार

कोपरगाव : सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने साखर कारखानदारीतील अनेक पायलट प्रकल्प सर्वप्रथम साकारत राज्याला त्यातुन दिशा देण्यांचे काम केले असुन आगामी तीन गळीत हंगामात सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना साखर उता-यात सर्वात टॉपचा कारखाना म्हणून गणला जाईल, असा विश्वास अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी ५९ गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केला .उस गळीतातुन विविध प्रकारचे ॲसिड , उपपदार्थ निर्मीतीवर मुख्य भर देवुन साखर हे बाय प्रॉडक्ट ठेवणार आहे, पॅरासिटामॉल औषधी प्रकल्पातुनही आत्मनिर्भरतेचे पाउल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले .

          सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांचा ५९ वा गळीत हंगाम मंगळवारी २६ ऑक्टोंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव मा. आमदार स्नेहलता कोल्हे,उपाध्यक्ष आप्पासाहेब दवगे,  संचालक संजयराव होन, सौ. लता होन या उभयतांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुन करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेश सचिव मा. आमदार स्नेहलता कोल्हे होत्या.           प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी स्वागत व प्रास्तविक करत कोल्हे कारखाना प्रशासकीय, आर्थिक, शिस्त, सुरक्षितता आणि गुणवत्ता या पाच शिस्तीवर विशेष लक्ष केंद्रीत करून आयएसओ ९००१-२०१५ मानांकन मिळविण्यासाठी पुढाकार घेत आहे.       

सहकार महर्षी कोल्हे कारखान्याच्या ५९ व्या गळीत  हंगामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे

याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवगे, संचालक मंडळातील सदस्य निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, भास्करराव भिंगारे, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, सोपानराव पानगव्हाणे, राजेंद्र कोळपे, शिवाजीराव वक्ते, विलासराव वाबळे, मनेष गाडे, प्रदिप नवले, श्रीमती सोनुबाई भाकरे, संगिता नरोडे, मच्छिंद्र लोणारी, वेणुनाथ बोळीज, शेतकरी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मुख्य अभियंता के. शक्य, मुख्य रसायनतज्ञ विवेक शुक्ला, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, विश्वासराव महाले, साईनाथ रोहमारे, त्रबंकराव सरोदे, कामगार नेते मनोहर शिंदे, केशव भवर, गणेश परिसराचे गंगाभाउ चौधरी, शिवाजीराव लहारे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात , तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, महावीर दगडे, नरेंद्र डंबीर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, स्वप्नील निखाडे, बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे, रिपाईचे दिपक गायकवाड, संजीवनी उद्योग समुहाचे विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आदि उपस्थित होते.           

  बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शेतकरी व साखर कारखानदारीचे खरे कैवारी असुन त्यांनी व देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलबाबत शाश्वत धोरण घेत साखर कारखानदारी वाचविण्यांसाठी पुढाकार घेतला. विरोधी पक्षनेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० वर्षापासुन प्रलंबित असलेला साखर कारखानदारीचा आयकराचा प्रश्न केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडुन त्याची मोठी सोडवणुक केली.   

       श्री. कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी, ट्रक ट्रॅक्टरधारक मालकांना स्मार्ट कार्ड देणार असुन त्याद्वारे हिशोबाचा लेखाजोखा ठेवणार आहे, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीबरोबर कारखान्याने करार केला असुन सर्वप्रथम उपग्रहाद्वारे प्रत्येक सभासद शेतक-याच्या उसाची मोजणी, त्याची गुणवत्ता, दर्जा निरीक्षण करण्यांचे काम सुरू करत आहे. चालु वर्षी कारखान्याने ८ लाख २५ हजार मे टनाचे गाळपाचे उददीष्ट ठेवले असुन या हंगामात तयार होणा-या साखरेपैकी ५ लाख टन कच्च्या साखरेची निर्यात करणारा कोल्हे कारखाना पहिला ठरला आहे. कारखान्यांने उस व उसाचा दर्जा याकडे विशेष लक्ष दिले असुन माती परिक्षण, उसाचे बेणे यासाठी कोईमतुर व वसंतदादा शुगर इन्स्टिीटयुटच्या माध्यमांतुन सर्वोत्कृष्ट सीड फाउंडेशनचे बेणे सभासद शेतक-यांना पुरवित आहे. उस उत्पादक सभासद व कामगार हे साखर कारखानदारीची दोन चाके असुन दोघांची जबाबदारी महत्वपुर्ण आहे, अधिका-यापासुन ते शेवटच्या घटकापर्यंत सर्वांनी कारखाना आपला आहे असे समजुन काम करावे. दिवाळीनिमीत्त कामगारांना १८ टक्के बोनस देण्यात येईल असे ते म्हणाले. अध्यक्षपदावरून बोलतांना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, सत्ता असो अगर नसो मात्र या मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यांचा प्रामाणिक प्रयत्न आपला असतो, मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देवुन त्याची सोडवणुक करावी. मागील व चालू हंगामात अतिवृष्टी मुळे खरीप रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले त्याची पिक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करून दिवाळीचा दिलासा द्यावा असे त्या म्हणाल्या. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. 

चौकट

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना उपग्रहाद्वारे उस उत्पादक सभासदांची उस गुणवत्ता, क्षेत्र निरीक्षण आणि दर्जा याचे मोजमाप करणारा देशातील पहिला कारखाना राहिल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page