ब्रेकिंग न्यूज कोपरगावातील अवैद्य कत्तलखान्यावर नगरपालिकेचा हातोडा

ब्रेकिंग न्यूज
कोपरगावातील अवैद्य कत्तलखान्यावर नगरपालिकेचा हातोडा

Breaking News
Municipal hammer on illegal slaughterhouse in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 30 Oct 2021,11:28Am.

कोपरगाव : राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर ही सातत्याने चोरून मारून कोपरगाव शहरातील संजय नगर भागात गोवंश हत्या मोठ्या प्रमाणात केली जात होती वारंवार या संबंधात तक्रारी करूनही पोलिसी कारवाई झाल्यानंतरही घराच्या कंपाऊंडच्या आडोशाने अवैद्य कत्तलखाने सुरू होते.याबाबत गेल्या महिन्याभरापासून कोपरगाव शहरातील हिंदू संघटना गोवंश हत्या बंदी समिती यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शनिवारी(३०) सकाळी साडे दहा पावणेअकराच्या सुमारास नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेने शहर पोलीस, कमांडो पथक नगरपालिका विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी जेसीपी अशा सर्व ताफ्यासह ही जोरदार कारवाई करून या भागातील आठ ते दहा कत्तलखाने उद्ध्वस्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page