संजीवनी ज्यु. काॅलेजचा ऋषिकेश गाडेकर ९९. ९७ पर्सेन्टाईल राज्यात ३१ वा- नितीन कोल्हे
Sanjeevani Jew. Rishikesh Gadekar 99 of the college. 31st in 97th percentile – Nitin Kolhe
एमएचटीसीईटीच्या परीक्षेत ३० विद्यार्थी ९०30 students in MHTCET exam 90
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 30 Oct 2021,1:28Pm.
कोपरगांव: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत आक्टोबर/नोव्हेंबर, २०२१ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र तसेच इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये (एमएचटीसीईप ःऔटी) संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या ऋषिकेश शरद गाडेकर या विद्यार्थ्याने ९९. ९७ पर्सेन्ंटाईल मिळवुन पीसीएम गटात राज्यात ३१ वा व काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर पीसीबी गटात किर्ती दत्तात्रय निकम हीने ९९. ०० पर्सेन्टाईल मिळवुन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. एमएचटीसीईटीच्या परीक्षेत ३० विद्यार्थी ९० पर्सेन्टाईलच्या वरती आहेत, ही संजीवनीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभा संपन्नतेची सिध्दता आहे, असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी दिली आहे.
राज्यातुन ८ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेमध्ये १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तर २ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड् परीक्षेमध्ये झाले आहेत. यातील काही गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे. कंसात पर्सेंटाईल दिले आहेत.
पीसीएम गटः ऋषिकेश शरद गाडेकर (९९. ९७ ), प्रज्वल विलास मापारी ( ९६. ५९), ज्ञानेश्वर विजय शिंदे ( ९६. २२), अब्बुसामा मोहम्मदइस्माईल मोमिन (९५. २६), समर्थ राजेंद्र कुलकर्णी (९४. २६), वैष्णवी प्रदिप पटारे (९३. १३), ऋषिकेश गोरख वहाडणेे ( ९२. ८९), प्रतिभा हिरामण पगार (९१. ९४), साक्षी ज्ञानदेव शिंदे (९१. ७०), अनुश्री श्रीराम तांबे (९१. ३० ),अंकित संतोष धाडीवाल (९१. १३), समर्थ जालींदर कडू (९०. ६१) पारस श्रीकांत शिरसाठ ( ९०. २८ 8) व समिर भिमराज मुंगसे (९०. ००).
पीसीबी गट: किर्ती दत्तात्रय निकम (९९.१०), प्रतिक्षा लक्ष्मण मोरे (९८.७३), धृती नितीन रावळ (९८.२५), श्रृती अनिल जाधव (९७.३५), राहीत काकासाहेब इंगळे (९६.८४), अनुजा गणेष बसवेकर (९५.५९), दिप्ती संजय टुपके (९५.२४), प्रविण संभाजी पोटे (९५), सायली नारायण उशिर (९४.३१), ऋतुजा संदिप गायकवाड (९४.०४), स्नेहल हरी वाघ (९३.७५), क्रिषराज धनंजय बडदे (९३.६०), वैभव गोरख चौधरी व मिलींद भिका सोनवणे, अब्बुसामा मोहम्मदइस्माईल मोमिन (९२.७२), स्नेहल प्रभुदान मोंडल (९१) व वफियाह मुझफ्फरली सय्यद (९०.४५).
चौकट
आपल्या यशाबद्धल ऋषिकेश गाडेकर व किर्ती निकम म्हणाले,की संजीवनी ज्युनिअर काॅलेज मधिल अनुभवी प्राद्यापक वर्ग, नियमित करून घेण्यात आलेला सराव, व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी घालुन दिलेली शिस्त व मेंटर पध्दती अंतर्गत वैयक्तिक लक्ष या सर्व बाबींमुळे आम्ही सहज चांगले यश मिळवु शकलो.
संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. ऋषिकेशच्या राज्यस्तरीय यशाबध्दल नितिन कोल्हे व सुमित कोल्हे यांनी त्याचा व वडीलांचा सत्कार केला.