विद्यार्थ्यांनी कलागुणांचा विकास करावा- विठ्ठल बरुरे
Students should develop artistic qualities- Vitthal Barure
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 30 Oct 202117:00Pm.
कोपरगाव : मोबाईल टीव्ही व इंटरनेटच्या युगात तरुणाई भरकटत आहे. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी कला असते म्हणून लहानपणापासून आपल्यातील कलागुणांचा विकास करावा असे आवाहन विठ्ठल बरुरे सर यांनी व्यक्त केले.
तळेगाव मळे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान विषयातील अल्प खर्चिक सोपे प्रयोग सादर करताना श्री. बरुरे बोलत होते.
विठ्ठल बरुरे सर म्हणाले, हवेला दाब असतो, जादूचे बोट, गरम हवा वरच्या दिशेने जाते व आगकाडी न वापरता आग निर्मिती आदी प्रयोग प्रात्यक्षिकांसह सादर करून अंधश्रद्धा निर्मूलना विषयी माहिती दिली तसेच दीपावली सणासाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेत फटाके मुक्त दिवाळी करण्याबाबत आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक डी.एस.खेमनर वसंत भातकुडव, गोरख मगर, नितीन वाघ महेश गव्हाणे व श्रीमती चव्हाण उपस्थित होते.