एक सापडला; पुन्हा काही तासांतच कोपरगाव कोरोना युक्त झाले
कनेक्शन औरंगाबाद
वृत्तवेध ऑनलाइन : 12 July 2020
कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव येथे ४५ वर्षाच्या इसम कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्या संपर्कातील १७ जणांना कोपरगाव येथील कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली.
त्यामुळे कोरोना मुक्त झालेले कोपरगाव काही तासातच पुन्हा कोरोना युक्त झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, सदर ४५ वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून (२९जून) रोजी सुरेगाव येथे आली होती. (६ जुलै) रोजी श्वास घेतांना दम लागत असल्याने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु त्यांनी त्रास होत असल्याने नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना कोपरगाव येथील सद्गुरू गंगागिरी महाराज कॉलेजच्या मुलींच्या वस्तीगृहातील कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. यात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा ही समावेश असून त्यांचे स्वॅब घेउन आज तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.