सद्गुरू गंगागीर महाविद्यालयात युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत कोविड लसीकरण
Covid vaccination under Youth Health Mission at Sadguru Gangagir College
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 30 Oct 202117:50Pm.
कोपरगाव :कोपरगाव येथील श्री सदगुरू गंगागीर महाराज कॉलेजमध्ये मोफत कोरोना लसीकरण शिबीर शुभारंभ प्राचार्य डॉ.शंकर थोपटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय छात्र सेना, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
लसीकरण शिबीर यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका श्रीमती नंदू नवले, आरोग्य कर्मचारी कर्मचारी सौ. विजया दुशिंग, सौ. मीरा पवार, दीपक जाधव यांच्यासह डॉ. चंद्रभान चौधरी, प्रा. सौ. शोभा दिघे, प्रा. एम. के दिघे, प्रा. डॉ. सुरेश काळे, प्रा. अमोल चंदनशिवे, प्रा. डॉ. बी. एम. वाघमोडे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अरुण देशमुख, डॉ. सुभाष रणधीर, डॉ. विजय निकम, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे, रजिस्टार सुनील ठोंबरे, अधीक्षक सुनील गोसावी आदिंसह सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.