दिव्यांगांना स्वावलंबी करणे हाच एकमेव उद्देश -आ. आशुतोष काळे

दिव्यांगांना स्वावलंबी करणे हाच एकमेव उद्देश -आ. आशुतोष काळे

The only purpose is to make the disabled self-reliant. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 31 Oct 2021,15:00Pm

कोपरगाव : दिव्यांगांना स्वावलंबी करण्याचा एकमेव उद्देशातून कृत्रिम साधनांच्या मदतीने दिव्यांगांच्या अडचणी दूर होतील असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी शनिवारी (३०) रोजी  कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ व फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड, मुंबई यांच्या आवश्यक साधनांचे मोफत वाटपप्रसंगी केले.

मतदार संघातील दिव्यांगासाठी आ.आशुतोष काळे यांनी नोंदणी प्रमाणपत्र वाटप, विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. २०० दिव्यांग बांधवांना १० लक्ष रुपयांच्या व्हीलचेअर, वॉकर, तीन चाकी सायकल, वॉकिंग स्टिक, ट्रायपॅॉड, कॉड्रीपॉड, स्लीपर चेअर, ॲल्युमिनियम क्रचेस, फोल्डिंग वॉकर, एलबो क्रचेस, कृत्रिम पाय, कॅलीफर आदी वस्तू मोफत देण्यात आल्या. त्यांना आधार देण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

यावेळी मानद सचिव विलास कोलगावकर, जनरल मॅनेजर अत्रीनंदन ढोरमारे, कारभारी आगवण, योगेश गंगवाल, सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुनराव काळे, सुधाकर रोहोम, पद्माकांत कुदळे, राहुल रोहमारे, अनिल कदम,  मधुकर टेके, दिलीप दाणे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गोरक्षनाथ जामदार, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, कलविंदरसिंग डडियाल, बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. माधवी वाकचौरे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page