आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना नियंत्रणात  – आ. आशुतोष काळे

आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना नियंत्रणात  – आ. आशुतोष काळे

Corona under control due to health system –  Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 31 Oct 2021,15:20Pm.

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण प्रसंगी पंचायत समिती येथे केले.

आ.काळे म्हणाले की, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन कोटीच्या नूतन इमारतीमुळे सर्व अडचणी दूर झाल्या असून  रुग्णवाहिका मिळाल्यामुळे नागरिकांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.     

यावेळी  सौ. पोर्णिमा जगधने,  अर्जुनराव काळे,  सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे,  अनिल कदम, मधुकर टेके, गोरक्षनाथ जामदार, राहुल रोहमारे,  धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, सुनील शिलेदार,  दिलीपराव चांदगुडे, सुनील गाडे, संदीप जाधव, प्रशांत वाबळे, दिलीपराव दाणे, बाबासाहेब शिंदे, राहुल जगधने, नारायण होन, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. सुनील मोरे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page