अतिवृष्टीच्या भरपाईपोटी तीन कोटीचा पहिला हप्ता मंजूर – आ. आशुतोष काळे

अतिवृष्टीच्या भरपाईपोटी तीन कोटीचा पहिला हप्ता मंजूर – आ. आशुतोष काळे

 First installment of Rs 3 crore sanctioned to compensate for excess rainfall – Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 31 Oct 2021,15:30Pm.

कोपरगाव : ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ मधील अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्यासाठी ३ कोटी ०९ लाख नुकसान भरपाई महाविकास आघाडी सरकारने मंजूर केल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

चालू वर्षी खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी, मका, आदी खरीप पिकांचे तसेच भाजी पाला व कांदा रोपाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.राज्याचे  ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे  दिवाळीच्या आत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून बाधित शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी ०९ लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

याबद्दल आ. काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, मदत पुनर्वसनमंत्री ना. विजय वडेट्टीवार, मदत पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे.           

Leave a Reply

You cannot copy content of this page