अद्यावत नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ – आ. आशुतोष काळे

अद्यावत नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ – आ. आशुतोष काळे

We will provide funds for an up-to-date theater. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 5 Nov.2021,17.00Pm.

कोपरगाव : ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेल्या कोपरगावने राज्य व देश पातळीवरील दर्जेदार कलाकार घडविले,हे पुढे सुरु ठेवण्यासाठी अद्यावत नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी मराठी रंगभूमी दिनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी दिली.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे ज्येष्ठ कलाकार श्रीमती बिरारी,
धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, राजेंद्र वाकचौरे,सुनील शिलेदार फकीर कुरेशी,दिनकर खरे, डॉ. मयूर तिरमखे, राजेंद्र खैरनार, इम्तियाज अत्तार, आकाश डागा, राजेंद्र जोशी, अॅड. मनोज कडू, चंद्रकांत शिंदे, शैलेश शिंदे, डॉ. किरण लद्दे, गणेश सपकाळ, दिपक गंगवाल, मनोज शिंदे, राहुल देवरे, केतन कुलकर्णी आदी मान्यवरांसह नाट्यरसिक उपस्थित होते.

आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगावच्या भूमीतील गुणवंत कलाकार घडवणारे खुले नाट्यगृह हे कोपरगावचे वैभव आहे. या नाट्यगृहाच्या रंगमंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करून अनेक दिग्गज कलाकार घडले असून या कलाकारांनी नाट्य कलाकार म्हणून भूमिका पार पाडत असतांना थेट चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून फिल्मी जगतात कोपरगावचे नाव पोहोचवले आहे याचा मला अभिमान वाटतो. हा कलेचा वारसा पुढे असाच सुरु ठेवण्यासाठी शहरात असलेले खुले नाट्यगृहाची वास्तू हि सुस्थितीत असणे गरजेचे आहे परंतु सर्व सुविधा असलेले अद्यावत नाट्यगृह असणे देखील आवश्यक आहे. अनेक नाट्य कलाकार व नाट्यरसिकांची देखील मागील अनेक वर्षापासूनची अद्यावत नाट्यगृहाची मागणी आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी नाट्यगृहाला निधी उपलब्ध करून देवू. नाट्य कलाकारांच्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page