ध्येयासाठी परिस्थितीचा बागुलबुवा उपयोगाचा नाही- आ.आशुतोष काळे
The situation is not useful for the Bagulbua – MLA Ashutosh Kale
कोळगाव-थडीच्या भूमिपुत्रांचा सत्कार Bhumiputra of Kolgaon-Thadi felicitated
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 6 Nov.2021,19.00Pm.
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व कोळगाव थडी पुढच्या भूमिपुत्रांनी मिळविलेले यश दैदिप्यमान असून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम घ्यावेच लागते, ध्येयासाठी परिस्थितीचा बागुलबुवा उपयोगाचा नाही असे मत आ.आशुतोष काळे यांनी भूमिपुत्रांच्या सत्कार प्रसंगी कोळगाव थडी येथे शनिवारी व्यक्त केले.
आ. आशुतोष काळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी उन्नतीत कमी नसतात धेय्य निश्चित असल्यास परिस्थिती अडसर ठरू शकत नाही, हे आजच्या या सत्कार मूर्ती यांनी दाखवून दिले आहे असे गौरवोद्गार व्यक्त केले.अध्यक्षस्थानी काळे कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन पद्माकांत कुदळे हे होते,

यावेळी कोळगाव थडीचे भूमिपुत्र
डॉ. अनंत शिरसाठ यांना फ्रान्स विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी,मानस वाकचौरे यांची जपान येथे उच्च शिक्षणासाठी निवड, किरण मेहेरखांब यांची जी एस टी विभागात राज्य कर निरीक्षकपदी पदी निवड झाल्याबद्दल, डॉ.संदीप निंबाळकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विषयात संशोधन मार्गदर्शकपदी निवड झाल्याबद्दल, सतिश पानगव्हाणे यांनी पुणे इथे जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारल्याबद्दल व कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला.
या सत्कार प्रसंगी सभापती सौ. पोर्णिमा जगधने, काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक राजेंद्र मेहरखांब, अरुण चंद्रे सरपंच सौ. मीनल गवळी, उपसरपंच सुनील चव्हाण, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, सदस्य डॉ. आय.के.सय्यद, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रविंद्र काळे, शहाजापुरचे उपसरपंच बाळासाहेबजी ढोमसे उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्तविक बबनराव वाकचौरे यांनी केले. स्वागत व सूत्रसंचलन अरुण रुपवते यांनी केले.
चौकट :- कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, गौतम पब्लिक स्कूल व उच्च शिक्षण घेण्यासाठी सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालय सुरु केल्यामुळे आम्ही शिक्षण घेवू शकलो व यश देखील मिळवू शकलो अशा भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या.





