जगातील एकमेव मंदीर परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात लक्ष्मीपुजन संपन्न
Lakshmi Pujan held at Param Sadguru Shukracharya Maharaj Temple, the only temple in the world
कोपरगाव : शहरानजीक बेट भागात नजीक असलेल्या परमसद्गुरु शुक्राचार्यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या जगातील एक मंदिर एकमेव मंदिर म्हणून ओळख असलेल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात लक्ष्मी पूजन धूम धडाक्यात करण्यात आले.
याप्रसंगी मंदिराच्या विविध क्षेत्रात योगदान असलेल्या तसेच दानशूर व्यक्तींच्या मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने दीपावली निमित्त प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र बेट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सरोजिनी आव्हाड यांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम ब्रहावृंदाच्या उपस्थितीत पार पडला. बांधकाम व्यावसायिक उद्योजक अनिल सोनवणे यांनी यावेळेस काही सूचना मांडल्या.
यावेळी रमेश गुरव यांनी सनईवादन केले.याप्रसंगी सचिन परदेशी, प्रसाद प-हे, मुन्ना आव्हाड बाळासाहेब साखरे, संजय वडांगळे यांच्यासह नागरिक महिला ग्रामस्थ उपस्थित होते.