चिमुरडीवर अनैसर्गीक लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी

चिमुरडीवर अनैसर्गीक लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी

Attempted unnatural sexual assault on Chimurdi; Accused remanded in police custody for four days

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 8 Nov.2021,16.00Pm.

कोपरगाव : शहरातील कॉलनी मध्ये दुपारी घरासमोर अंगणात खेळत असणाऱ्या एका पाच वर्षाच्या चिमुरडीला पैसे देतो असे आमिष दाखवून आरोपी याने घरात बोलावून त्या लहानग्या चिमुरडीबरोबर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रविवारी दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चिमुरडी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपी दिलीप रामेश्वर पासवान हल्ली राहणार सह्याद्री कॉलनी कोपरगाव मुळ रा.कठणपुर ता.बेडम जि.रोहताज, बिहार याने तिस पैसे देण्याचे अमिष दाखवुन घरात बोलावून त्या लहानग्या चिमुरडीबरोबर नैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सविता रंगनाथ गाडेकर यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. रात्री उशिरा असून आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अत्याचारापसुन संरक्षण अधिनियम व्दारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास अटक केली. सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ११ नोव्हेंबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक वासुदेव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.दाते करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page