जिल्ह्याचा निम्मा भाग विकासासाठी साई संस्थांनवर सोपवावा- मंत्री हसन मुश्रीफ
Half of the district should be handed over to Sai Sansthan- Minister Hasan Mushrif
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 8 Nov.2021,18.00Pm.
कोपरगाव: शिर्डी सारखे मोठे संस्थान आमच्या जिल्ह्यात आहे जिल्ह्याचा निम्मा भाग संस्थांवर सोपवावा अशी आमची मनापासून इच्छा होती. त्या दृष्टीने आपण नियोजन केले होते. परंतु ती संपूर्ण व्यवस्था उच्च न्यायालयाकडे असल्यामुळे आमचे जे मनोदय होते ते काय साध्य झाले नाही अशी खंत जिल्ह्याचे पालक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव येथे सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ऑक्सिजन जनरेटर प्लांट इमारत उद्घाटन समारंभप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार आशुतोष काळे यांनी केले.
ना. हसन मुश्रीफ म्हणाले, शिर्डी साई संस्थान येथे आपण आता आशुतोष काळे यांना तिथे अध्यक्ष म्हणून नेमले आहे परंतु संपूर्ण संचालक मंडळ न झाल्यामुळे उच्च न्यायालयात त्याला थांबविण्यात आले आहे साईबाबा हे संकट लवकरच दूर करतील यापूर्वी जे जे अध्यक्ष झाले ज्यांनी वाईट कारभार केला त्यांना त्याचे प्रायश्चित्त साईबाबा ने लवकरच दिले असे आशुतोष काळे यांनी सांगितले. ते साई संस्थांनचा एक एक पैसा चांगल्या कामी लावून साई भक्तांची सोय असेल भागाचा विकास असेल ते चांगल्या प्रमाणे करतील आणि साईबाबा त्यांना प्रसन्न होईल. अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून अतिशय निगर्वी व आजात अजातशत्रू स्वभावाने विनयी असलेल्या आमदार आशुतोष काळे यांच्या मागे या पुढच्या काळात कोपरगावच्या सगळ्या विकास कामांमध्ये मी त्यांच्या मागे हिमालयासारख्या उभा राहीन असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
ना. हसन मुश्रीफ म्हणाले ,२५: १५: ३० : ५४ जिल्हा नियोजन कडून जो निधी येतो त्याचे जास्तीत जास्त निधी आजपर्यंत आ. आशुतोष काळे यांना दिला आहे. पुढच्या काळातही देईन असे सांगून उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सडक योजना टप्पा दोन मंजूर करणार आहोत त्या मधून आपण रस्ते देणार आहोत यातून जास्तीत जास्त रस्ते निधी आ. आशुतोष काळे यांना देईन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त रस्ते निधी आ. आशुतोष काळे यांना देणार, येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात त्यांची टर्म पुर्ण होईल त्यावेळी या कोपरगावचे एकही विकासाचे काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचे नियोजन आपण करू, आपल्या पाण्याचा प्रश्न आपल्या शहरांमध्ये अनेक प्रश्न असतील यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून चांगलं काम करायचं प्रयत्न करू असा विश्वास या निमित्ताने देतो असेही ते म्हणाले, . कोरोना काळात पहिली दुसरी लाटेत फार मोठी आणि देशाची राज्याची जिल्ह्याची यादी अहमदनगर जिल्हा कोरोना बाधितांमध्ये सर्वात जास्त आघाडीवर होता. रोखायची असेल तर आपल्या प्रत्येक विभागात चांगली सुविधा आपण केल्या पाहिजेत ऑक्सीजन टंचाईमुळे त्रास सहन करावा लागू नये म्हणून बेडची व्यवस्था केली १४ ग्रामीण रुग्णालयांमध्ये शंभर कोटी खर्च करून जिल्हा नियोजनाच्या ३० टक्के रक्कम खर्च केली. फार समर्थपणे कोरोनाला तोंड देण्याचा प्रयत्न केला.
ना.मुश्रीफ म्हणाले,राज्याचे चित्र कोरोना चे संकट राज्य शासनाने कसे काम केले चौदा हजार कोटी सरकारी कर्मचारी वेतन व निवृत्तिवेतन वर आपण खर्च करतो केला कोरोना काळात १२ हजार कोटी जमा होत दोन हजार कोटी महिन्याला राज्य शासन कर्ज काढत होते ही कर्जाची रक्कम पावणे दोन लाख कोटी झाली त्यातील ४० ते ५० टक्के कर्मचारी बसूनच पगार घेत होते शाळा, प्राथमिक शाळा,माध्यमिक , कॉलेज सुरू नव्हत्या तरी सुद्धा आपण इतके मोठे काम आपल्या विकास कामांना कात्री लावून हा प्रयत्न केला. तेवीस हजार कोटी ३४ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यात एकाच हंगामात निसर्ग, तौकी, गुलाब व अशियाना ही चार चक्रीवादळे आली अतिवृष्टी नंतर परतीचा पाऊस गेला,या काळात एकदा ११ हजार कोटी एकदा १० हजार कोटी अशी आपण एकवीस हजार कोटीची मदत केली आहे एकीकडे करोना महामारीशी झुंजत असताना, संघर्ष करत असताना विकास कामांना कात्री लावून आपण काम करत असताना या चक्रीवादळामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते ते सुद्धा पैसे आपण दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न केला दोन ते तीन महिना कोरोना ओसरला आहे त्यामुळे आपली तिजोरी भरू लागली आहे. येणारी तिसरी लाट साईबाबांनी थोपवावी अशी प्रार्थना करूया, आपल्याला विकासाची राहिलेली कामे पूर्ण करण्याची साईबाबांनी शक्ती द्यावी एवढीच प्रार्थना या निमित्ताने करतो पुन्हा एकदा विकासकामांच्या निमित्ताने कोपरगाव ला येण्याचे वचन देतो असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमास झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, झेडपी सदस्य सुधाकर दंडवते, शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोरक्षनाथ चव्हाण सर यांनी मानले.