संजीवनी इंजिनिअरींगच्या २५ विद्यार्थ्यांची  साडेचार लाखाच्या  पॅकेजवर काॅग्निझंटमध्ये निवड – अमित कोल्हे

संजीवनी इंजिनिअरींगच्या २५ विद्यार्थ्यांची  साडेचार लाखाच्या  पॅकेजवर काॅग्निझंटमध्ये निवड – अमित कोल्हे

25 students of Sanjeevani Engineering selected in Cognizant on package of Rs. 4.5 lakhs – Amit Kolhe

 Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 9 Nov.2021,12.00Am.

कोपरगांवः संगणकिय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काॅग्निझंट सोल्युशनस् या अमेरिकन बहुराष्ट्रीय  आघाडीच्या कंपनीमध्ये सज्जन इंजिनिअरिंगच्या २५ विद्यार्थ्यांची साडेचार लाखाचे वार्षिक पॅकेज वर निवड करण्यात आली असल्याची माहिती  संजीवनी इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली. ग्रामिण भागातील शेकडो विद्यार्थी स्वावलंबी होत असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुरज बाळासाहेब भाबड, सोनाली पोपट नाईक, पल्लवी संजय वैष्णव , सुरज रमेश  राशिंकर , प्रशांत अशोक  डोखळे, भगवान  अशोक शिंदे , ऋषिकेश  दत्तात्रय कोते, हिरण आयुष  पारस, स्नेहल महेंद्र जेजुरकर, कांचन प्रेमचंद सुपे, धनश्री रावसाहेब पवार, गुरूदत्त श्रीपाद कायस्थ, सोनाली कैलास सोनवणे, रिया रमेश  माळी, आयुष  विनोद शर्मा, प्रशांत  विठ्ठल देवकाते, रफिक मुसा सय्यद, प्रतिक्षा रविंद्र मोकळ, महेश शिवाजी शिंदे , गणेश  रंगनाथ जाधव, मोहिन अस्पर सय्यद, स्नेहल सुदामराव गायकवाड, आकाश अशोक  ढसाळ, श्रीकांत विजय रहाणे व वैभव सुधिर मोरे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे .  

 संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष  शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष  नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी  समाधान न्यक्त करून सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड  प्प्लेसमेंटच्या टीमचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page