पंधरा फूट खड्डयात पडलेल्या चिमुरडीला  जेसीबीच्या साह्याने  वाचविले

पंधरा फूट खड्डयात पडलेल्या चिमुरडीला  जेसीबीच्या साह्याने  वाचविले

With the help of JCB, Chimurdi was rescued from a 15 feet deep pit

 पालिका पोलीस व स्थानिक नागरिक दिड ते दोन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन Municipal police and local citizens rescue operation of one and a half to two hours

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 9 Nov.2021,16.30Pm.

कोपरगाव:  कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात मंगळवारी सकाळी इमारतीच्या बांधकामासाठी पाईलच्या‌ खड्डयात पडलेल्या चार वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात प्रशासनाला‌ यश आलं आहे.दिड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करून चिमुकलीला बाहेर काढण्यात आले.

प्रथमोपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, परंतु तिची प्रकृती स्थिर आहे.ईश्वरी संतोष गंगावणे असे मुलीचे नाव आहे.

याबाबत  मिळालेली माहिती अशी की ईश्वरी गंगावणे ही चार वर्षीय चिमुकली आज मंगळवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी काम सुरू असलेल्या  इमारतीजवळ खेळत होती. खेळता खेळता ती इमारतीसाठी खोदलेल्या १५ फूट खोल खड्डयात  पडली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला कळवले. नगरपालिकेचे अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी  जेसीबी मशीन बोलावून ईश्वरी पडलेल्या खड्ड्याच्या समांतर  खड्डा खोदून दोन्ही त्याला बोगदा पाडून चिमुरड्या ईश्वरीला  स्थानिक  नागरिकांच्या मदतीने  सुखरुप बाहेर काढले.  शिवसेना नगरसेवक कालू आप्पा आव्हाड व मनसेचे कार्यकर्ते बापू काकडे  त्यांच्या मित्र मंडळाने  तातडीने अंबुलन्स ने तिला जनार्दन स्वामी रुग्णालयात नेण्यात आले घटनास्थळी तहसीलदार विजय बोरुडे शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी तातडीने हजर झाले जनार्दन स्वामी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सुदैवाने तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page