निळवंडेच्या मंजुर पाण्याच्या कबरीवर पाच नंबर तलावाचा मकबरा उभारू नका

निळवंडेच्या मंजुर पाण्याच्या कबरीवर पाच नंबर तलावाचा मकबरा उभारू नका

Do not erect the tomb of lake number five on the sanctioned water grave of Nilwande

पाणी दोन्ही कडून मिळवा, पण हक्क सोडण्याचे पाप करू नका Get water from both, but do not sin to give up

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 12 Nov.2021,12.30Am.

कोपरगाव : निळवंडे शिर्डी कोपरगाव या २६०.३९ कोटीच्या मंजूर बंदीस्त पाईपलाईन पाणी योजनेवरील हक्क सोडा, तरच १२० कोटीच्या साठवण तलावास परवानगी देवू ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांनी घातलेली जाचक अट म्हणजे मंजूर झालेल्या २६० कोटीच्या निळवंडेच्या पाण्याच्या कबरीवर पाच नंबर साठवण तलावाचा १२० कोटीचा मकबरा उभा करण्यासारखे आहे. अनेक ठिकाणी दोन किंवा जास्त ठिकाणाहून पाणी शहरात येत असते मात्र इतरत्र कोठेही अशा अटी घातल्या जात नाही मग इथेच  ही अट का? अट काही असो पण एवढ्या मोठ्या योजनेवरील हक्क सोडण्याचे पाप करू नका. पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करता हे पाणी घालवून  पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका !

या मकबरात पाणी भरण्यासाठी एक्सप्रेस कॅनाल मधून पाणी उचलता आले पाहिजे तरच सोयीचे होणार आहे,ते शक्य आहे का ?

१२० कोटीच्या साठवण तलावासाठी जीवन प्राधिकरणाच्या जाचक अटी

४) शिर्डी संस्थान, शिर्डी नगरपंचायत व कोपरगाव नगरपरिषदेसाठी निळवंडे धरण उद़भव धरून विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय क्रमांक सासंवि- २०१५/ १००७/प्र.क्र.-१७७(भाग-१)/का.१६.दि. ८ फेब्रुवारी २०१८ अन्वये प्रशासकीय मंजुरी प्राप्त असून योजनेची किंमत २४७.९९ कोटी निव्वळ व रुपये २६०.३९ कोटी ढोबळ इतकी आहे. आता सादर केलेल्या योजनेच्या प्रस्तावासाठी कोपरगाव नगर परिषदेने गोदावरी डावा कालवा उद़भव धरल्याने मूळ मंजूर निळवंडे धरण योजनेतून कोपरगाव नगरपरिषदेचा सहभाग राहणार नाही. त्यामुळे सदरच्या योजनेची प्रशासकीय मान्यता रद्द अथवा कोपरगाव नगरपरिषदेचा सहभाग वगळून सुधारित करणे बाबत शासनाचे सदरचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करताना कळविण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषद कोपरगाव यांची राहील.
५) शिर्डी संस्थान शिर्डी नगरपंचायत व कोपरगाव नगर परिषदेसाठी निळवंडे धरणातून पाणी आरक्षण मंजूर असून आता सादर केलेल्या योजनेच्या प्रस्तावासाठी कोपरगाव नगर परिषदेने गोदावरी डावा तट कालवा उद़भव धरल्याने मूळ निळवंडे धरणातील पाणी आरक्षण रद्द करणे किंवा कोपरगाव नगरपरिषदेचा सहभाग वगळून सुधारीत करणेबाबत जलसंपदा विभाग कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषद कोपरगाव यांची राहील.
७) सदर योजनेसाठी गोदावरी डावा कालवा उद़भव प्रस्तावित असून योजनेचा साठवण तलाव क्रमांक ४ व ५ हा अंशता गुरुत्व पद्धतीने आणि अंशत: पंपिंग करून भरणे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे योजनेच्या भांडवली खर्च आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे त्यासाठी साठवण तलाव क्रमांक ५ जवळून जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेस कालवा उद़भव घेतल्यास योजनेतील साठवण तलाव क्रमांक ४ व ५ संपूर्णतः गुरुत्व पद्धतीने भरता येणार आहे. त्यामुळे योजनेची भांडवली किंमत व देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील कमी होणार आहे. तरी यासाठी गोदावरी एक्सप्रेस कालवा मधून पाणी आरक्षण व त्यांना इनटेक वर्क्स करण्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी कोपरगाव कोपरगाव नगर परिषद कोपरगाव यांनी जलसंपदा खात्यास प्रस्ताव सादर करून पडताळणी व कार्यवाही करावी सदर प्रस्ताव जलसंपदा खात्याकडून नामंजूर झाल्यास मंजूर योजने प्रमाणे कार्यवाही करण्यात यावीत. पाणी लिफ्ट करण्याचा खर्च न पालिकेला परवडणारा आहे. , असे मत अनेकांनी व्यक्त केले.

देशासह राज्यात सगळीकडे वाढत्या लोकसंख्येनुसार वेगवेगळ्या विविध स्रोतांमधून पाणी आणण्यासाठी सत्ताधारी असो की विरोधक एकत्र येऊन प्रयत्न केले जातात. अनेक ठिकाणी शहरांमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त ठिकाणाहून पाणी आणले जाते असे असताना कोपरगावात मात्र केवळ राजकीय श्रेयासाठी व काहींच्या महत्त्वकांक्षी साठी विरोधाला विरोध करण्यात येत असून एवढी मोठी ऐतिहासिक मंजूर झालेली निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाइप योजनेला विरोध केला जात आहे. न्यायालयातून विरोध करून ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला परंतु न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर ही योजना कशी बासनात गुंडाळून ठेवता येईल यासाठी चाललेले प्रयत्न पाहता शहराच्या भवितव्याचा विचार न करता केवळ श्रेयाचा, मतांचा व स्वार्थाचा विचार केला जात असल्याचे दिसून येत आहे.

वास्तविकत सत्याकडे डोळेझाक केली जात आहे. पुढील पंचवीस वर्षाच्या शहराच्या पाणी प्रश्नाचा पाण्याचा आराखडा तयार करताना दारणा धरण आवक किती टक्के ? पाण्याचे आरक्षण किती टक्के आहे ? आणखी पाणी मिळण्याची किती शक्यता आहे? कोपरगाव साठवण तलाव चार यांची क्षमता किती?त्याचप्रमाणे पाचवा साठवण तलाव करून किती दिवसांची क्षमता वाढणार आहे ? याचे स्पष्ट आकडे नगरपालिकेने जनतेसमोर मांडले पाहिजे. केवळ विरोधाला विरोध म्हणून कोपरगावकरांचे पाणी घालविण्याचे पाप करू नका यासाठी नगरसेवकांनी नगरपालिकेत आपल्या बळाचा वापर करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजेत साठवण तलावासाठी तांत्रिक मंजुरी मिळविताना घालण्यात आलेल्या अटी-शर्ती मध्ये अट नंबर ४,५ व ७ निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईप योजनेतून मंजूर झालेल्या पाण्यावरील हक्क सोडावा लागणार आहे हे सत्य धाडसाने समोर मांडावे लागणार आहे आणि हे निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला बंदीस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणार्‍या योजनेबाबत कोपरगाव मधील ठराविक लोकांचा विरोध का ? याचे स्पष्टीकरण जाहीरपणे कोपरगाव शहरातील नागरिकांसमोर मांडले पाहिजे
निळवंडे धरणातून शिर्डीला पाणी येणार आहे, मग त्यांना गोदावरी उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावर हक्क सोडावा लागणार आहे का ? थोडक्यात ज्यांना ज्यांना नवीन ठिकाणाहून पाणी मिळणार आहे. मग त्यांचे इतर जूने स्त्रोत बंद होणार आहेत का? का फक्त कोपरगावला पाणी येऊ नये, यासाठी प्राधिकरणाने कोणाच्या सांगण्यावरून कोपरगाव पुरतीच ही अट घातली आहे का? कोपरगाव शहरातीलच काहीजण विरोध करीत आहेत यासारखे दुर्दैव व पाप दुसरे होऊ शकत नाही यासाठी कोपरगाव शहरातील वाढती लोकसंख्या व पाणी स्रोत असलेल्या गोदावरी खोऱ्यातील धरणावर पडलेले आरक्षण या सर्व वादावर तोडगा म्हणून निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईप योजना तत्काळ राबवण्याची गरज आहे. वादापेक्षा निळवंडे शिर्डी कोपरगाव प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीचे पाणी मिळवण्यासाठी एकजुटीने लढा व इतर स्त्रोत निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असा मतप्रवाह दिसला.

कोपरगाव सोडून सगळीकडे जास्तीत जास्त पाणी कसे मिळेल यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा चालू असते परंतु कोपरगाव येथेच मंजूर झालेल्या निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त शून्य खर्चातील योजनेला योजनेवरील हक्क सोडून साठवण तलाव करण्याचा अट्टाहास म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे थोडक्यात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे जाण्याचाच हा प्रकार आहे., कोपरगाव शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी राजकारण विरहित जाऊन या पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास करून त्यासाठी सर्व लोकप्रिनिधींनी एकत्रित पाठपुरावा व लढा दिला पाहिजे. पाण्याचा वाद कशासाठी दोन्हीकडून पाणी येऊ द्या, समाजिक कार्यकर्ते  नागरिक व लोकप्रिनिधींना खाजगीत आमची भूमिका पटते परंतु, लोकांमध्ये नाही.

Leave a Reply

You cannot copy content of this page