रानडुक्कर, सोनेवाडी शिवारात धुमाकूळ ऊसाचा फडशा – प्रा. जावळे

रानडुक्कर, सोनेवाडी शिवारात धुमाकूळ ऊसाचा फडशा – प्रा. जावळे

वृत्तवेध ऑनलाईन 12 july 2020

कोपरगाव : तालुक्यात असलेल्या सोनेवाडी शेती शिवारात काही दिवसांपासून रानडुक्करांचा धुमाकूळ सुरू आहे. या वन्य प्राण्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बंदोबस्त करा,अशी  मागणी प्रा. गीताराम जावळे यांनी केली आहे.

सोयाबीनची पेरणी उतरली नाही, आळी पडल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऊस शेती व मका पिके सध्या जोमात आहे.पिण्यास पाणी व खाण्यास अन्न मिळत नसल्यामुळे या प्राण्यांनी आपला मोर्चा शेतांकडे वळविला आहे.
सोनेवाडी पंचक्रोशीत ऊस शेतीवर हे रानडुक्कर तुटून पडत असून ऊस कुडतडल्याने उसाची वाट लागली आहे.वेळीच रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त केला नाही तर परिसरातील ऊस शेतीसह मका पिकेही उद्ध्वस्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
तेव्हा वनविभागाने तात्काळ या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page