सिमेंट रस्ते दिर्घकाळ टिकण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लक्ष द्यावे – आ. आशुतोष काळे
निमित्त भूमिपूजन : शहर पोलीस स्टेशन ते सप्तश्रुंगी मंदिर रस्ता
वृत्तवेध ऑनलाईन 12 July 2020
कोपरगाव : नागरिकांनी सिमेंट तयार झाल्यानंतर तो दीर्घकाळ टिकण्यासाठी पंधरा दिवस इथून येणे जाणे टाळावे, तर हे रस्ते टिकाऊ व दर्जेदार व्हावे यासाठी नगराध्यक्ष व संबंधितनगरसेवकांनी जातीने लक्ष घालावे अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी शहर पोलीस स्टेशन ते सप्तश्रुंगी मंदिर या शहरातील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी केल्या.
नगरपरिषद विशेष रस्ता अनुदान योजनेतुन शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये हा रस्ता होत आहे.
आ. काळे म्हणाले की, शहरातील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पोलीस स्टेशन या मुख्य रस्तबंदीत पर्यायी रस्ता म्हणून सण-उत्सवाच्या काळात या रस्त्याचा उपयोग होतो परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना त्रास होत होता. नगराध्यक्ष व सबंधित नगरसेवकांनी रस्त्याचे काम टिकावू व दर्जेदार होण्यासाठी जातीने लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस स्टेशन इमारतीचे कामाची पाहणी केली.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले,नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, हिरामण गंगुले, सुनील शिलेदार, हाजीमेहमूद सय्यद, नवाज कुरेशी, रमेश गवळी,अॅड. मनोज कडू, राजेंद्र जोशी, डॉ. तुषार गलांडे, संतोष टोरपे, प्रा.अंबादास वडांगळे, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, संदीप कपिले, रवींद्र राऊत, प्रकाश दुशिंग, दादामिया शेख,अनिल गायकवाड, सादिक शेख, जाकीर नालबी, अमोल गायकवाड, प्रताप गोसावी, जाफर कुरेशी, फयाज शेख,जाफर कुरेशी आदी उपस्थित होते.





