वारसांना ग्रामीण डाक जीवन विम्याचे २ लाख २९ हजाराचे धनादेश

वारसांना ग्रामीण डाक जीवन विम्याचे २ लाख २९ हजाराचे धनादेश

2 lakh 29 thousand checks of rural postal life insurance to heirs

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 15 Nov.2021,16.00Pm.

  कोपरगाव : तालुक्यातील कोळगावथडी येथिल रहिवाशी विजय निंबाळकर व ज्योती निंबाळकर यांना २ लाख २९ हजार रुपये रकमेच्या धनादेश कोळपेवाडी डाक कार्यालयाच्या वतीने कोळगावथडी ग्रामपंचायत च्या संरपच मिनल गवळी यांच्या हस्ते वारसांना प्रदान करण्यात आला.

कर्मवीर शंकरराव काळे  कारखाना डिस्टलरी विभागात मजुरीवर काम करणारे किशोर विजयराव निंबाळकर हे कामावरून सायकल वर घरी जात असतांंना सुरेगाव मिशन शाळे जवळ विजेच्या तुटलेल्या तारेच्या शाँक लागुन त्याचा म्रुत्यु झाला होता. त्यांनी ग्रामीण डाक जिवन विमा योजनेची २०१८  मध्ये पाँलीसी घेतली असल्याने उपविभागीय निरीक्षक विनायक शिंदे डाकपाल विजय जोर्वकर पूजा वाकचौरे यांनी सर्व कागदपत्रे वेळेत गोळा करुन त्यास अधिक्षक विजय कोल्हे खाडलिकर यांनी तात्काळ कारवाई करत सदर प्रकरण मंजूर केले कोळपेवाडी डाक कार्यालयात मयताच्या वरील वारसांना संरपच मिनल गवळी पुंजाजी राऊत यांच्या हस्ते धनादेश चे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ शामराव मेहेरखांब चंद्रशेखर गवळी डाकपाल राजेंद्र नानकर विजय जोर्वकर नंदकिशोर लांडगे शमशोद्दीन शेख ज्ञानेश्वर चांदगुडे, गिरीश महाले, अमोल वारे, विशाल पाचोरे, रवी शिदें, अमोल झांबरे यावेळी उपस्थित होते डाकपाल विजय जोर्वकर यांनी डाक विभाग राबवित असलेल्या योजने बाबत माहिती दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page