संजीवनीचे ५ विद्यार्थ्यांची एसएपी प्रशिक्षणातून आयबीएम कंपनीत निवड – अमित कोल्हे

संजीवनीचे ५ विद्यार्थ्यांची एसएपी प्रशिक्षणातून आयबीएम कंपनीत निवड – अमित कोल्हे

    5 students of Sanjeevani selected in IBM company through SAP training – Amit Kolhe

   कोपरगांवः संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या  जागतिक पातळीवरील कंपनीशी  सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण  देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या २०२०-२१  च्या बॅचमधिल संजीवनीच्या ५  विद्यार्थ्यांची  १७१ देशात  विस्तार असलेल्या आयबीएम या मुळच्या अमेरिकन कंपनीने रू ४. ५ लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकऱ्यांसाठी   निवड केली केल्याची माहिती संजीवनी इन्स्टिट्यूटचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

अमित कोल्हे यांनी म्हटले आहे आयबीएम कंपनीने निवड केलेल्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या निखिल संभाजी भाकरे, सुरज बाळासाहेब भाबड, अमित अरूण चोथे, सना शरिफ शेख व शुभम सुरेश  इंगळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा समावेश आहे   इतरही कंपन्यांनी सॅपचे प्रशिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांच्या  मुलाखती घेतल्या असुन त्यांचे निकाल या  आठवड्यात  जाहिर होतील एसएपी या केंद्रामार्फत ॲडव्हान्सड बिझिनेस अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग (एबीएपी), मटेरिअल मॅनेजमेंट (एमएम), प्राॅडक्षन अँड  प्लानिंग (पीपी), हुमन काॅम्प्युटींग मॅनेजमेंट (एचसीएम), फायनांसियल अकौंटींग (एफए) आणि सेल्स अँड  डिस्ट्रीब्युशन (एसडी) अशा  प्रकारच्या कोर्सेचे प्रत्येकी २००  तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना   अधिकचे देवुन त्यांना मुलाखतींसाठी सक्षम केल्या जाते. एसएपी चे प्रशिक्षण  संजीवनी व्यतिरीक्त इतर विद्यार्थ्यांसाठीही   खुले असुन असे अनेक विद्यार्थी  या प्रशिक्षणाचा फायदा घेवुन नोकऱ्या मिळवित आहे. संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व  पालक यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना   डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी.ठाकुर व एसएपी समन्वयक डाॅ. ए.बी. पवार यांचे मार्गदर्शन  लाभले.

Leave a Reply

You cannot copy content of this page