निळवंडे असो की साठवण तलाव योजना दोन्हींच्या श्रेयात शिवसेनेचा अर्धा वाटा- राजेंद्र झावरे
Whether it is Nilwande or storage lake scheme, Shiv Sena’s half share in the credit of both – Rajendra Jhaware
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue16 Nov.2021,20.00Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून निळवंडे योजना की पाचवा साठवण तलाव योजना या योजनेवरून जर श्रेयाची लढाई होत असेल तर या दोन्ही योजनेच्या श्रेयात सिंहाचा नसला तरीही शिवसेनेचा अर्धा वाटा असल्याचे प्रतिपादन शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी मंगळवारी (१६) रोजी आमचे प्रतिनिधी जवळ बोलताना केले.
कोपरगाव शहराच्या पाच नंबर साठवण तलावासाठी एकशे वीस कोटी ची तांत्रिक मंजुरी मिळाली मात्र यासाठी जीवन प्राधिकरणाने घातलेल्या जाचक अटींमुळे सध्या शहरात वादंग उठले आहे. या पार्श्वभूमीवर झावरे बोलत होते.
राजेंद्र झावरे म्हणाले. सत्तेवर भाजप-शिवसेना युती सरकार असताना २०१८ मध्ये साई शताब्दी वर्षाच्या निमित्ताने निळवंडे शिर्डी कोपरगाव ही बंदिस्त पाईप योजनेला मंजुरी मिळाली. तेंव्हा सत्तेत शिवसेना होती. त्यानंतर आज २०२१ मध्ये महाविकासआघाडी सत्तेवर आहे. महाविकास आघाडीकडून पाच नंबर साठवण तलावासाठी १२० कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. आज मुख्यमंत्री शिवसेनेचाच आहे. तेंव्हा कोपरगाव च्या दोन्ही पाणी योजना मध्ये शिवसेनेचा सिंहाचा नाही पण अर्धा वाटा निश्चित असल्याचे ते म्हणाले, या दोन्ही योजना कार्यान्वित होणे हे कोपरगावच्या भविष्याच्या दृष्टीने गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले.
राजेंद्र झावरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तात्कालीन युवा सेना नेते आजचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोपरगावला आले असता त्यांनी येथील जाहीर सभेत कोपरगावच्या पाणी प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते.युतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी तात्कालीन जलमंत्री नामदार विजय बापू शिवतारे यांना तसे आदेश दिले होते. त्यांनीही तातडीने ही योजना मार्गी लावली होती. तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. हेही नाकारता येणार नाही. आज महा विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून पाच नंबर साठवण तलावासाठी १२० कोटी रुपयांची तांत्रिक मंजूरी मिळवली आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे दोन्ही कडून दोन्ही योजनांना शिवसेनेचा मोठा हातभार लागला असल्याचे सत्य नाकारता येणार येणार नाही. तेंव्हा या दोन्ही योजना दृष्टिक्षेपात आल्या असून त्या तातडीने पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढेच याठिकाणी म्हणता येईल. निमशहर आणि निमशहराचं झपाट्याने शहरात रूपांतर होत असताना साहजिक पाण्याची गरजही वाढत आहे. परंतु वेगाने सुरू असलेलं शहरीकरण आणि त्याच्या पाण्याच्या गरजेचा प्रश्न, स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्याप गंभीरपणे घेतलेला नाही.असेही शेवटी झावरे म्हणाले,





