निळवंडे व साठवण तलाव दोन्ही योजनांना माझे प्राधान्य ; लवकरच तसा ठराव करणार – विजय वहाडणे

निळवंडे व साठवण तलाव दोन्ही योजनांना माझे प्राधान्य ; लवकरच तसा ठराव करणार – विजय वहाडणे

My preference is for both Nilwande and storage ponds; Will make a resolution soon – Vijay Wahadne

जीवन प्राधिकरणाला अट घालण्याचा अधिकार कोणी दिला ? Who gave the life authority the right to impose conditions?

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed17 Nov.2021,20.00Pm.

कोपरगाव : मंजूर झालेली २६० कोटी ची निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजना व १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळालेला पाच नंबर साठवण तलाव  या दोन्ही योजनांना माझे प्राधान्य आहे. या दोन्ही योजना पदरात कशा पडतील हा माझा विषय असून   लवकरच यासाठी नगरपालिकेची  विशेष सर्वसाधारण सभा घेणार असून  संपूर्ण सभागृह हा ठराव १००% बहुमताने मंजूर करतील असा मला आशावाद असल्याचा ठाम आत्मविश्वास  नगराध्यक्ष विजय  वहाडणे यांनी बुधवारी (१७) नगराध्यक्षीय दालनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.  आम्ही फक्त  तांत्रिक मंजुरी मागितली होती.  निळवंडे हक्क सोडण्याची  अट घालण्याचा अधिकार जीवन प्राधिकरणाला कोणी दिला ? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी व्यक्त केला

कोपरगाव  शहराच्या  पाच नंबर साठवण तलावासाठी एकशे वीस कोटीची तांत्रिक मंजुरी मिळाली मात्र यासाठी जीवन प्राधिकरणाने घातलेल्या जाचक अटींमुळे सध्या शहरात वादंग उठले आहे.  या पार्श्वभूमीवर वहाडणे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

वहाडणे म्हणाले, पाणीप्रश्न लवकर सुटावा अशी अपेक्षा आहे. या विषयावर  विविध राजकीय पक्ष, राजकीय नेते, याच्यामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप वाद-विवाद राजकीय संघर्ष सुरू असलेले आपण बघतो या राजकीय वादविवादाशी जनतेला काहीही घेणे देणे नाही,सध्या पाच नंबर  साठवण तलाव तलावाला  मिळालेली तात्विक  मान्यता  आणि  आरक्षणावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी घातलेली अट यावर सर्वत्र चर्चा चालू आहे, खरेतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी अशी अट घालण्याचे काहीही कारण नव्हतं, आम्हाला त्यांच्याकडून फक्त पाच नंबर तलाव व वितरण व्यवस्था यासाठी तांत्रिक मान्यता आम्हाला  त्यांच्याकडून पाहिजे होते. त्यांनी तांत्रिक मान्यता दिली, याबद्दल त्यांचे जाहीर आभार पण ही जी अट आहे पाच नंबर तलाव पूर्ण करत असताना त्यांनीही ही जी अट निळवंडे च्या पाण्याचे आरक्षण रद्द करून घ्यावं अशी अट  घालावयास नको होती, ते योग्य नाही असे मला वाटते. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 वहाडणे पुढे म्हणाले, मी लवकरच सर्वसाधारण सभा घेऊन नांदूर मधमेश्वर निळवंडे चे मंजूर असलेले पाणी हे मिळालेच पाहिजे असा ठराव मांडणार आहे. आणि मला अशी खात्री आहे. सर्व पक्षाचे सर्व नगरसेवक १००% हा माझा प्रस्ताव ठराव बहुमताने  मान्य करतील, भविष्यात ही कोपरगाव शहराला पाणी कमी पडू नये. यासाठी दोन्ही ठिकाणचं पाणी आरक्षण रहाणं अत्यंत महत्त्वाच आहे.
आता तर आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे आता साई संस्थान चे अध्यक्ष झाले आहेत. या दोन्ही पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार साहेब नगरपालिकेला सहकार्य करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे.२०३६ पर्यंत नांदूर मधमेश्वर मधून आपल्यासाठी ५.९६ दशलक्ष घनमीटर हे पाणी मंजूर आहे त्यानंतरही  आम्हाला २०३६ नंतर ७.२२ दशलक्ष घनमीटर पाणी आम्हाला मिळाव २०३६ नंतर पाण्याचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी आपण नगरपालिकेने केलेली आहे. असेही वहाडणे यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना वहाडणे म्हणाले, या निमित्ताने मी सर्व राजकीय नेते पक्ष पाण्यासाठी  झगडणारे प्रामाणिक कार्यकर्ते माझ्या सर्वांना माझे   आवाहन राहील. आम्ही सगळ्यांनी एक पथ्य पाळलं पाहिजे, पाणी या विषयावर इथून पुढे कोणीही एक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू नये. असे आरोप प्रत्यारोप होणं ते पाण्यासाठी आसुसलेल्या जनतेलाही मान्य नाही. जनता बोलत नाही. पण जनतेच्या मनातलं ओळखायचं सर्व नेत्यांची शिकलं पाहिजे श्रेय कोणीही घ्या, पण आम्हाला नियमित पाणी द्या, हे जनतेच्या मनातलं खरं मत आहे. जनतेचे हेच मागणं आहे. माझेही हेच म्हणणं आहे की, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला आपल्या सर्वांचा पाणीप्रश्न हा सर्वांनी एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय सुटणार नाही. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केली
आज मी कुणावर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या फंदात पडणारही नाही. ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस आपण राजकीय पक्ष  बोलतील पण आजच्या काळात माझे प्राधान्य या दोन्ही पाणी योजना कोपरगावसाठी आपल्या पदरात कशा पडतील असाच माझा प्रयत्न राहणार आहे, श्रेय हा माझा विषय नाही, आणि कधी असणारही नाही, श्रेय कोणालाही मिळू द्या, पण कोपरगाव च्या करदात्यां नागरिकांना नियमितपणे पाणी शुद्ध पाणी मिळावं हाच हेतू ठेवून मी या ठिकाणी काम करतो आहे, असे ते म्हणाले
पुढे बोलतांना वहाडणे म्हणाले, दोन महिन्यापूर्वीआलेले मुख्याधिकारी शांताराम गोसावी व आमचा तटपुंजा स्टाफ घेऊन २४ तास प्रयत्न या कामासाठी  आम्ही करीत आहोत. सर्वांच्या प्रयत्नातून तांत्रिक मान्यता मिळालेली आहे.  आपला प्रस्ताव डी. एम. ए. कडे सादर झालेला आहे. त्याची तपासणी झाल्यानंतर नेमलेल्या कमिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे  तो प्रस्ताव जाईल त्या मीटिंगला मला व मुख्याधिकारी यांनासुद्धा बोलावले जाईल किंवा जो कोणी नगराध्यक्ष त्या काळामध्ये असेल त्याला बोलावले, जाईल मला पूर्णपणे खात्री आहे. राजकीय मंडळींनी  जर मोठे मन ठेवलं राजकीय मंडळी आरोप-प्रत्यारोप बंद केले, श्रेय हा विषय बाजूला जर ठेवलं तर निळवंडेचेही पाणी आपल्याला येईल  आणि पाच नंबर साठवण तलाव बांधून नवीन जलवितरण व्यवस्थाही आपली पुर्ण होईल. याची मला पूर्णपणे खात्री आहे.
हे सर्व करत असताना पाणी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. निळवंडे पाणी योजनेची पन्नास वर्षापासून वाट पाहणारे जे शेतकरी आहेत, लाभार्थी आहेत, त्यांना  सुद्धा त्यांच्या वाट्याचे पाणी व्यवस्थित मिळाले पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही, न्यायालयाने त्यांचा  तो हक्क अबाधित ठेवला आहे असे समजते.

चौकट
कोपरगावकरांनी पाच वर्षांपूर्वी ज्या भरघोस ऐतिहासिक मतांनी विजय वहाडणे यांना १७ नोव्हेंबर रोजी निवडून दिले होते. त्या विजयाच्या पाचव्या वर्धापन दिनी नकळत का होईना कोपरगावकरांच्या प्रलंबित पाणीप्रश्नावर दिलखुलास, स्पष्टपणे, आपले परखड, सकारात्मक मत मांडून कोपरगावकरांना आशेचा किरण दाखविला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांना मिळालेल्या वाढीव कार्यकाल त्यांनी या दृष्टिक्षेपात असलेल्या दोन्ही योजना प्रत्यक्षात उतरण्यासाठी खर्ची घालावा हीच अपेक्षा !

Leave a Reply

You cannot copy content of this page