पाण्याच्या राजकारणामुळे एकत्र या ; आणि मराठवाड्याप्रमाणे पाणीप्रश्न कायमचा सोडवा-संजय काळे

पाण्याच्या राजकारणामुळे एकत्र या ; आणि मराठवाड्याप्रमाणे पाणीप्रश्न कायमचा सोडवा-संजय काळे

Come together because of water politics; And like Marathwada, solve the water problem forever – Sanjay Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,11.00Am.

कोपरगाव : कोपरगाव शहरासाठी पिण्याचे पाणी व तालुक्याचे शेतीचे पाणी मिळविण्यासाठी कारखान्याचे भाव ठरविताना जसे एकत्र येता, तसे चितळे मिठाई प्रमाणे एकत्र या, कोपरगावचा पाणी प्रश्न मराठवाड्या प्रमाणे कायमचा सोडवा अशी कळकळीची विनंती आजी, माजी आमदारांना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

संजय काळे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव शहराला प्रतिदिनी २५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात १२.५० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. याचा अर्थ निम्मे पाणी आपल्याला मिळते ही गोष्ट लक्षात घेऊन, तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी युतीच्या काळात निळवंडे  धरणावरून प्रतिदिनी १३ दशलक्ष लिटर पाणी मागणीचा प्रस्तावपाठविला व त्यास मंजुरी मिळविली होती सरकारने २०१८ साली निळवंडे धरणावर कोपरगावसाठी ६.४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले होते. परंतु त्यानंतर पट क्रमांक १२ मध्ये निळवंडे चे पाणी मिळाले की, गोदावरीचे पाणी आपोआप रद्द होईल, असे स्पष्ट केले होते. पुढे २०१९ मध्ये शुद्धिपत्रक काढून पाणी आरक्षण ६.४ दशलक्ष घनमीटर वरून ४.७५ दशलक्ष घनमीटर केले. अर्थात १.२९ दशलक्ष घनमीटर कमी केले, तरीही आपल्याला बंद पाइपातून निळवंडे चे स्वच्छ शुद्ध पाणी मिळणार  आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाण्यावरील हक्क सोडला तर ते पाणी कोपरगावसाठी कमी पडेल, गोदावरीचे पाणी कमी पडेल, सन २०२१ मध्ये आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तळे १ ते ४ नंबर तळे तळे विस्तारीकरण व मजबुतीकरण करून सर्व ५ तळयांची एकूण क्षमता ११०० दशलक्ष लिटर प्रतिदिन साठी तांत्रिक मंजुरी मिळवली, परंतु प्राधिकरणाने त्यातील अट क्रमांक ४ प्रमाणे निळवंडे धरणावरील पाणी आरक्षणाचा हक्क कोपरगाव नगरपालिकेने सोडावा, अशी अट घातली आहे. एकंदरीत दोन्ही योजनासाठी ज्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोपरगावचे पाणी वाढणार नाही. यासाठी कोपरगावला गरज व मागणीप्रमाणे पाणी मिळण्यासाठी दोन्ही योजना विनाअट सुरू होणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती आहे असे त्यांनी म्हटले आहे.
संजय काळे म्हणाले, दोन्ही योजनांच्या मंजुऱ्या मिळवताना शासनाने विचित्र अटी घातल्या आहेत. या दोन्ही अटीबाबतचा विरोध दोन्ही आजी-माजी आमदारांनी त्या त्या वेळेस करायला हवा होता, पण तसे झाल्याचे दिसले नाही. परंतु अजून वेळ गेलेली नाही, सध्याचे आमदार आशुतोष काळे यांचे शासनात प्रचंड वजन आहे. कमी वयात त्यांना साईबाबा संस्थांचे अध्यक्षपद मिळाले हे त्यांचे वजन सिद्ध करते. त्यांनी आपल्या वजनाचा वापर करून दोन्ही अटी रद्द करून दोन्हीकडचे पाणी अबाधित ठेवावे. तसेच राहुरीला कृषी विद्यापीठामध्ये शरद पवार आले असता माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला. हे त्यांचे संबंध कोपरगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरून दोन्हीकडील पाणी आरक्षण अबाधित ठेवण्याची त्यांनीही शरद पवारांना गळ घालावी, असेही काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

संजय काळे पुढे म्हणाले, नगरपालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून विषय कुरवाळत बसू नका, कोपरगाव निवृत्त नागरिकांचा तालुका व्हायला लागला आहे. तेंव्हा श्रेयवादाच्या नादात दारणा व गंगापूर धरणावर नाशिक महानगरपालिका व औद्योगिकचे आरक्षण वाढवून शेतीचे पाणी जाऊन तालुका भकास व दुष्काळी होणार नाही, याची काळजी घ्या, तालुक्याने गेल्या चाळीस वर्षात आमदारकी आपल्या दोन घराण्यातच ठेवली आहे. सुदैवाने आमदार आशुतोष काळे सरकारमध्ये आहेत, व साई संस्थांचे अध्यक्ष आहेत. कोपरगाव शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याची संधी त्यांना आहे. गतीने त्यांनी हे काम करावे, ही रास्त अपेक्षा ! कोपरगावकरांची आहे.असेही काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

चौकट
कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. सुदैवाने आठ दिवसाने पाणी मिळाले तरी कोपरगावची जनता चैनीत आहे. सध्या हे सर्व सोयीस्कर वाटत असले तरी असे किती दिवस चालणार शहरातील लोकसंख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन दृष्टिक्षेपात आलेल्या दोन्ही पाणी योजना तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. कोणी एकाने केवळ मी म्हणतो तेच व्हावे हे म्हणणे म्हणजे केवळ आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखेच आहे. असे शहरातील सुज्ञ नागरिकांचे मत आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page