संजीवनी इंजिनिरींग गुणवत्ता व दर्जामुळे ओबीई रॅन्कमध्ये देशात ४० वे – अमित कोल्हे

संजीवनी इंजिनिरींग गुणवत्ता व दर्जामुळे ओबीई रॅन्कमध्ये देशात ४० वे – अमित कोल्हे

   Sanjeevani Engineering ranks 40th in the country in OBE rank due to quality and quality – Amit Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,16.00Pm.

कोपरगांव: हायलाईटस् या इंग्रजी मासिकाने देशपातळीवर घेतलेल्या ओबीई रॅन्कींग २०२१ या सर्वेक्षणात गुणवत्ता व दर्जा मुळे संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला अकॅडमिक एक्सलंस वर्गवारीत ४० वा रॅन्क मिळाला असल्याची  माहिती संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे. नगर नाशिक जिल्ह्यात हा रॅन्क मिळविणारी संजीवनी कॉलेज एकमेव आहे असेही ते म्हणाले,

अमित कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व प्रा. शैलेश  पालेकर यांनी हायलाईटस् मॅगेझिनने प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार सर्व माहिती पुराव्यांसहित ऑनलाईन  भरली. यात प्रामुख्याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेला ऑटोनॉमस  (स्वायत्त) संस्थेचा दर्जा, आवुटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई-परीणाम/निष्पत्ती  आधारत शिक्षण ), अध्यापन-अध्ययन (टिचिंग -लर्निंग) पध्दतीमधिल आधुनिकता व नाविण्यता, समावेश  आणि विविधता, औद्योगीक प्रशिक्षण  आणि संस्थेच्या माध्यमातुन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या  नोकऱ्या , उद्योजकता आणि नवकल्पना या बाबींवर भर देण्यात आला होता. यात परीक्षकांनी संस्थेत असलेला पी.एच.डी. शिक्षित  प्राद्यापक वर्ग, प्रयोगशाळा व वर्ग खोल्यांमधिल सादरीकरणासाठी आधुनिक उपकरणे, कॅम्पसमधिल  इंटरनेट व वायफाय सुविधा, डीजीटल क्लासरूम्स, संस्थेस मिळालेले राज्य व देश  पातळीवरील विविध पुरस्कार, विध्यार्थ्यांना  मिळत असलेले तांत्रिक, खेळ, सांस्कृतिक व इतरही क्षेत्रातील दैदिप्यमान यश , ग्रीन अँड  स्मार्ट कॅम्पस, सौर उर्जा प्रकल्प, आदि बाबींची शहानिशा  करून देश पातळीवर संजीवनीला ४० वा रॅन्क दिला.

माजी मंत्री व संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page