६९ शेतकऱ्यांना शेततळे अनुदानाचे ३३ लाख ७६ हजार रुपये मिळणार – आ. आशुतोष काळे

६९ शेतकऱ्यांना शेततळे अनुदानाचे ३३ लाख ७६ हजार रुपये मिळणार – आ. आशुतोष काळे

69 farmers will get Rs. 33 lakh 76 thousand as farm subsidy. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,20.00Pm.

 कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील ६९ शेतकऱ्यांचे शेततळ्याचे राहिलेले अनुदान मिळावे यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना लवकरच ३३ लाख ७६ हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २०१९-२० या वर्षातील ६९ लाभार्थी शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित होते. या शेतकऱ्यांना रखडलेले अनुदानासाठी राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांची भेट देखील घेवून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून रखडलेले अनुदान तातडीने मिळावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली होती. त्या मागणीची कृषी विभागाने दखल घेवून सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी संपूर्ण राज्याला ५२.५० कोटी निधी मंजूर केला आहे. या निधीतून २०१७, २०१८, २०१९ व २०२०-२१ मध्ये पूर्ण झालेल्या शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील ६९ लाभार्थी शेतकऱ्यांचे जवळपास ३३ लाख ७६ हजार एवढी बाकी असलेली रक्कम मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. शेततळ्याच्या अनुदानाचा प्रश्न सरकारने सोडविल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.    

Leave a Reply

You cannot copy content of this page