केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी भाजपा कार्यालय चा लाभ घ्या – विवेक कोल्हे

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी भाजपा कार्यालय चा लाभ घ्या – विवेक कोल्हे

Take advantage of BJP office for information on Central and State Government schemes – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,20.20Pm.

कोपरगांव : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वंचित घटकांनी भाजपा कार्यालयाशी संपर्क साधून लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी धामोरी येथे भारतीय जनता पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले त्यावेळी केले. अध्यक्षस्थानी प्रकाश वाघ होते.

अशोक भाकरे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व भायुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, बाळासाहेब पानगव्हाणे यांनी पक्ष संघटनात्मक कार्यासह प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. याप्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी, डॉ राजकुमार दवंगे, माजी सभापती सुनिल देवकर, ऋषीकेश कदम, बाजीराव मांजरे, प्रभाकर मांजरे, विजय जाधव, सुनिल वाणी, विलास माळी, भाउसाहेब भाकरे, गोरख कोकाटे, प्रभाकर पारखे, भाउसाहेब जाधव, राजेंद्र कासार, विलास भाकरे, पांडुरंग पगार, संजय पगार, विजय साळुंके, अविनाश अहिरे, बाळासाहेब अहिरे, काकासाहेब वाघ, नजिम शेख, बाळासाहेब गलांडे, विश्वनाथ लव्हाटे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, नागरिक, उपस्थित होते. धामोरी गांवच्यावतींने विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यांत आला. विवेक कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनात ८० कोटी भारतीयांना मोफत अन्नधान्य व सर्वांसाठी मोफत लससह असंख्य सुविधा दिल्या. भारतीय जनता पक्ष देशपातळीवर सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे सातत्याने वंचित घटकांच्या विकासासाठी झटत असतात. धामोरी पंचकोशीचा परिसर मोठा असुन अहमदनगर व नाशिक जिल्हयांचा परिसर लाभला आहे. वंचित घटकांना दळणवळणांच्या सोयी सुविधा कमी असल्याने त्यांना तालुक्याच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही, अशा वंचित घटकांच्या सेवेसाठी विविध सेलच्या पदाधिका-यांनी तत्पर राहुन पक्षाच्या माध्यमांतुन होणा-या कार्यक्रमांची माहिती द्यावी असे आवाहन केले. शेवटी बाळासाहेब अहिरे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page