निळवंडे व साठवण तलाव योजनाबाबत भाजप जाणणार जनतेची मन की बात- विवेक कोल्हे

निळवंडे व साठवण तलाव योजनाबाबत भाजप जाणणार जनतेची मन की बात- विवेक कोल्हे

BJP will know the minds of the people about Nilwande and storage lake scheme – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,20.30Pm.

कोपरगांव : मंजूर झालेली निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणी योजना व ५ नंबर साठवण तलाव या दोन्ही योजनामुळे शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून या दोन्ही योजना बाबत जनतेची ‘मन की बात’ काय आहे हे थेट संपर्कातून जाणून घेण्याचा ठराव कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या चिंतन बैठकीत करण्यात आला. बैठकीत कोल्हे कुटुंबीयाबाबत वैयक्तिक द्वेष पसरविण्यात येत असल्याबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला पटवून देवु असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगांव शहर भारतीय जनता पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सेलचे प्रमुखांची चिंतन बैठक गुरूवारी संपन्न झाली. या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यांत आली.

यावेळी विवेक कोल्हे यांनी, येणाऱ्या दहा दिवसात घरोघर नागरिकांपर्यंत थेट संपर्क करून कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबाबत नागरिक व महिलांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊन पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. भायुमो.चे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले,सुत्रसंचलन सुशांत खैरे यांनी केले. शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी प्रास्तविक केले.

याप्रसंगी विजय आढाव, नारायण अग्रवाल, विनोद राक्षे, हाशिमभाई पटेल, रिपाईचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, केशव भवर, सुशांत खैरे, शरद त्रिभुवन, खालीकभाई कुरेशी, एस पी पठाण, फकिर महंमद पहिलवान, सुजल चंदनशिव, अर्जुन मोरे आदिंची भाषणे झाली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पराग संधान, बाळासाहेब नरोडे, दिलीप दारूणकर, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, बबलु वाणी, सर्व आजी माजी नगरसेवक, सिध्दार्थ साठे, जयेश बडवे, हरिभाउ गिरमे, नरेंद्र डंबीर, महावीर दगडे, संदिप देवकर, दिपक जपे, प्रमोद नरोडे, वैभव आढाव, यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, भाजपा कार्यकर्ते आदि उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page