तुमचा लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न सोडविण्यास बांधील – आ. आशुतोष काळे

तुमचा लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न सोडविण्यास बांधील – आ. आशुतोष काळे

Your people’s representative will be bound to solve your problems. Ashutosh Kale

   Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,20.40Pm.

कोपरगाव: दोन वर्षात मतदार संघातील बहुतांश गावात विकास पोहोचला असून प्रत्येक गावात विकास पोहोचवयाचा आहे. त्यासाठी तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी करंजी येथे लोकार्पण कार्यक्रमात केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांडूभाई पठाण होते.

आ. काळे म्हणाले की, मतदार संघातील जनता सूज्ञ आहे. जनतेला विकास पाहिजे. राज्यात शासन कुणाचे आहे व विकास कामे कोण करते याची जनतेला जाणीव आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे यापुढील काळात देखील राज्यशासनाकडून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.            

यावेळी सभापती सौ. पोर्णिमा जगधने, कारभारी आगवण, बाळासाहेब बारहाते,संजय आगवण, माजी संचालक चांगदेव आगवण, विलास परजणे, गोवर्धन परजणे, बाबासाहेब शिंदे, राहुल जगधने, गणेश दाणे,जालिंदर संवत्सरकर, भाऊसाहेब नवगिरे, भरत जगताप, मच्छिंद्र भिंगारे, विजय कदम, भास्कर रहाणे, रविंद्र भिंगारे, भावूरव कापसे, भैय्या शेख गट शिक्षणाधिकारी पोपट काळे,शबाना शेख, शाखा अभियंता सी.टी. लाटे, मुख्याध्यापक हरिभाऊ वाघ, ठेकेदार संदीप उंडे,  किशोर डमाळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.      

  चौकट :- तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या संजीवनी कारखाना ते पढेगाव गोदावरी जुन्या कालव्या पर्यंतच्या रस्त्याच्या कामाची २.५ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. – आ. आशुतोष काळे                   

Leave a Reply

You cannot copy content of this page