समताचे विद्यार्थी समताचे नाव सातासमुद्रापलीकडे नेतील- सौ दीपिका आचारी

समताचे विद्यार्थी समताचे नाव सातासमुद्रापलीकडे नेतील- सौ दीपिका आचारी

Samata students will take Samata’s name beyond Satasamudra – Mrs. Deepika Achari

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,20.45Pm.

 कोपरगाव : समता च्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटातून आर्थिक सबलीकरण आणि सक्षमीकरण केले जात आहे. असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी २०२१ च्या विजेत्या सौ. दीपाली आचारी यांनी समता परिवाराच्या सत्कार समारंभ प्रसंगी केले. समता स्कूल च्या विविध उपक्रमांमुळे समता चे विद्यार्थी समताचे नाव सातासमुद्रापार घेऊन जातील. असेही त्या म्हणाल्या, या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे समता चे संस्थापक काका कोयटे हे होते.

महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा २०२१ विजेत्या सौ. दीपाली आचारी व स्विमिंग राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सौ. सुषमा आचारी या सासू व सूनेचा समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते गौरवचिन्ह,शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  स्विमिंग राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सौ. सुषमा आचारी म्हणाल्या की, माझ्या सुनेने वैद्यकीय व्यवसाय असतानाही स्वतःतील गुण विकसित करत आज  महाराष्ट्रात सौंदर्य सम्राज्ञी म्हणून स्वतःच्या नावाबरोबरच कोपरगाव तालुक्याचेही नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. काका कोयटे म्हणाले की, कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून डॉ दीपाली आचारी यांनी इतर महिलांना आदर्श ठरेल अशी कामगिरी केली असून त्यांच्या सासू सौ. सुषमा आचारी  यांनी देखील स्विमिंग मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविले आहे त्यामुळे सर्व कोपरगावकारांसाठी ही भूषणावह बाब आहे.    

   याप्रसंगी समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ. लिसा बर्धन,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक, नातेवाईक उपस्थित होते. सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ. शिल्पा वर्मा यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page