कोपरगाव चा पाणी प्रश्न निकाली निघणार या भीतीपोटीच कोल्हेंकडून दिशाभूल -सुनिल गंगुले
Kolhe misleads due to fear that Kopargaon water issue will be resolved – Sunil Gangule
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,21.00Pm.
कोपरगाव: १२० कोटीची तांत्रिक मंजुरीमुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघणार या राजकीय अस्तित्वाचा भीतीपोटीच कोल्हेंकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी विवेक कोल्हे यांच्यावर त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
पत्रकात गंगुले यांनी म्हटले आहे की, मागील पाच वर्षात राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असतांना देखील कोल्हेंना शहराचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही. ते काम आ.आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात करून दाखविल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. हे शहरातील प्रत्येक नागरिक जाणून आहेत. त्यामुळे त्यांची होणारी आदळआपट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे.
परंतु ४० वर्ष सत्ता भोगूनही पाणी प्रश्न सोडवू न शकलेल्या व ४२ कोटीच्या पाणी योजनेची कोणी वाट लावली? असा सवाल करताना गंगुले यांनी राजकीय द्वेषापोटी पत्रकार परिषदा घेऊन प्रश्न सुटत नसतात त्यासाठी आत्मीयता असावी लागते. हि आत्मीयता आ. आशुतोष काळे यांच्याकडे आहे. दोन ट्रक तांत्रिक मंजुऱ्या कोपरगाव नगरपालिकेत पडून असल्याचे सांगणाऱ्यांनी ज्याप्रमाणे २८ विकासकामांच्या मंजुऱ्या अडवल्या त्याप्रमाणे या मंजुऱ्या अडवल्यामुळेच आजपर्यंत कोपरगाव शहराचा विकास होवू शकला नाही असा टोला लगावला.
५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आ. आशुतोष काळे यांनी मिळविली आहे पुढे प्रशासकीय मान्यता देखील मिळवणार आहे. शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार आहे मात्र ज्या कोल्हे कुटुंबांनी २८ विकासकामांना न्यायालयात नेवून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा केला त्यांनासुद्धा मतदार निवडणुकीचे दाखवून देतील असे गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे .





