संजीवनी एमबीएचा ओम लाॅजिस्टिक्स सोबत सामंजस्य करार- अमित कोल्हे                                  

संजीवनी एमबीएचा ओम लाॅजिस्टिक्स सोबत सामंजस्य करार- अमित कोल्हे

 Sanjeevani MBA’s Memorandum of Understanding with Om Logistics – Amit Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,21.20Pm.

 कोपरगांव:   संजीवनीच्या एमबीए विभागाने ओम लाॅजिस्टीक्स या प्रत्येक क्षेत्रातील दळणवळणात आघाडीच्या कंपनीबरोबर सामजस्य करार केला असुन या कंपनी मार्फत एमबीए च्या विद्यार्थ्यांना  अधिकचे १००  तासांचे प्रशिक्षण  देवुन त्यांची अंतिम वर्षात  असतानाच रू  ३ ते ५ लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

अमित कोल्हे म्हणाले, संजीवनी एमबीए या ऑटोनॉमस  संस्थेने विविध कंपन्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना केल्यामुळे ग्रामिण महाराष्ट्रात  संजीवनी एमबीएने विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे. आता व्यवस्थापनाच्या पुढाकाराने डायरेक्टर डाॅ. ए.जी.ठाकुर व एम.बी.ए. विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली  ओम लाॅजिस्टिक्स या कंपनीबरोबर सामंजस्य करार केल्यामुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळण्यास अधिकची मदत होणार आहे. संजीवनीच्या  एमबीए मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्या साठी  वेगवेगळे उपक्रम राबवुन केवळ सुशिक्षित  न करता त्यांना सुसंस्कृत  करून नोकरदारही बनवित आहे व पालकांचे स्वप्नेही पुर्ण करीत आहे, असे श्री कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

माजी मंत्री व संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी संजीवनी एमबीएने ओम लाॅजिस्टिक्स या कंपनीबरोबर केलेल्या कराराचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page