संजीवनी अकॅडमीत स्पेल बी व ऑलीम्पियाड  स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार                                        

संजीवनी अकॅडमीत स्पेल बी व ऑलीम्पियाड  स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार
Sanjeevani Academy felicitates meritorious students of Spell B and Olympiad competitions

विद्यार्थ्यांनी  मिळविले राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  पातळीवर यश Students achieve national and international success

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,21.30Pm.

कोपरगांव:संजीवनी अकॅडमी नेहमीच नाविण्यासाठी ओळखली जाते. दरवर्षी  प्रमाणे या वर्षातही  विविध परीक्षांमध्ये विध्यार्थ्यानी आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले आहे. आंतरराष्ट्रीय  स्तरावर घेण्यात आलेल्या स्पेल बी इंटरनॅशनल एक्झामिनॅशन मध्ये संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी  विविध पदकांची कमाई केली. तसेच सायन्स ऑलीम्पियाड फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय  पातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी यश  प्राप्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा  स्कुलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्या सुंदरी सुब्रमण्यम, सौ. माला मोरे, सौ. शैला  झुंजारराव, बालाराम साहु, सौ. शैलजा  घोरपडे उपस्थित होते.

 

स्पेल बी इंटरनॅशनल एक्झामिनॅशन मध्ये साऊल सारंग पाटील व सारानाज झिया शेख  यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. तर इरा सारंग पाटील, इशिका  पुनमकुमार छाजेड, शुभ  निखिल समदडिया, सुरभी संतोषकुमार  कोकणे व संविदा अमोल जोशी हे विशेष  प्राविण्यासह उत्तिर्ण झाले. तर अन्वी गितेश  गुजराथी, विराज अमोल वाघ, निशिगंधा  वाबळे व वेदांश  पुनमकुमार छाजेड यांनी स्पर्धेत सह भागी होवुन प्रमाणपत्र मिळविली.
   

 सायन्स ऑलीम्पियाड फाऊंडेशन (एसओएफ) ही राष्ट्रीय  पातळीवरील संस्था असुन शालेय विध्यार्थ्यांना  सायन्स, मॅथेमॅटीक्स, काॅम्प्युटर, इंग्लिश , जनरल नाॅलेज आणि इतर व्यावसायिक  अभ्यासक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट  बनविण्याच्या हेतुने मागील २५ वर्षांपासून  या संस्थेद्वारे देश  पातळीवर वेगवेगळ्या विषयांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये संजीवनी अकॅडमीच्या हर्षल  विरसिंग पावरा, इरा सारंग पाटील, साऊल सारंग पाटील, आर्या अमोल अटक, ओवी अनुप आघाव, श्रीतेज रविकिरण आहेर, अन्विता आप्पासाहेब आदिक, ईशान  इमरान सय्यद, सुरभी संतोष  कोकणे, स्वरीत मनोज गोलेचा व क्षितिज विश्राम चव्हाण यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली.  
       

 विद्यार्थ्यांच्या  सत्कार प्रसंगी  सौ. मनाली कोल्हे म्हणाल्या की ग्रामिण भागातील विद्यार्थी हे शारीरिक व माणसिक दृष्टीने  सुदृढ असतात. अनेकदा विध्यार्थ्यांना  वाटते की राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  पातळीवरील स्पर्धांमध्ये आपल्याला यश  मिळणार नाही. परंतु ही माणसिक न्युनगंडता बाहेर फेकण्यात संजीवनीला अकॅडमीला यश  प्राप्त झाले असुन अनेक विद्यार्थी आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडवित यशाकडे मार्गस्थ होत  आहे, यात पालकांचा पाठींबाही महत्वाचा आहे.
     

विद्यार्थ्यांच्या   या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष  शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page