भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन
BJP state secretary Snehalta Kolhe paid a visit to Kartik Swamy
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir19 Nov.2021 17.00Pm.
कोपरगांव : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सौ. कलावतीताई नितीनदादा कोल्हे यांनी कार्तिकी पौर्णिमेनिमीत्त मतदार संघातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथील कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
प्रारंभी सुधाकर जाधव, संभाजी गमे व पुणतांबा ग्रामस्थांनी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे स्वागत केले. याप्रसंगी अतुल कुलकर्णी, चंद्रकांत वाटेकर, देविदास डोखे, रामभाउ डोखे, कार्तिक स्वामी भक्त मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, दिलीप उगले, शरद गोरे, अशोक राउत, शंकर शेलार, शोभा राउत, सुनंदा जाधव आदि उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केल्याची अख्यायिका आहे. यावेळी त्यांनी कार्तिक स्वामींना कोरोनारुपी तारकासुराचा वध करण्याची प्रार्थना केली .
पुणतांबा परिसरातील कार्तिक स्वामी मंदिरासह, चांगदेव महाराज स्थान, पुण्य क्षेत्रातील अन्य पुरातन मंदिरासह मामा भाचे मंदिर, महादेव मंदिर, चक्रधरस्वामी मंदिर आदिंचा दर्जा वाढवुन भाविकांना याठिकाणी विविध सुख सोयी निर्माण करण्यांसाठी तत्कालीन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले असुन ते अंतिम स्तरावर आहे. तीर्थक्षेत्र पुणतांबा कार्यस्थळावर धाकटी एकादशी मोठया प्रमाणांत साजरी केली जाते. गंगा गोदावरी स्नानासाठी याठिकाणी भाविक मोठया संख्येने दाखल होत असतात त्यांच्या दैनंदिन गरजा परिपुर्णतेसाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्या शेवटी सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या. सुनंदा जाधव यांनी आभार मानले.





