कोपरगावच्या शेतकऱ्यांनाही ५० टक्के ऐवजी ८० टक्के ठिबक अनुदान मिळणार – आ. आशुतोष काळे
Kopargaon farmers will also get 80 per cent drip subsidy instead of 50 per cent. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir19 Nov.2021 17.20Pm.
कोपरगाव : कोपरगावच्या शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के ठिबक अनुदान मिळत होते. आता कोपरगावच्या शेतकऱ्यांनाही अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आ.काळे म्हणाले,ठिबक सिंचन हि काळाची गरज असून आज प्रत्येक शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने शेती करत आहे. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धत फायद्याची असून त्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच इतरही अनेक फायदे असल्यामुळे बहुतांश शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने शेती करीत आहे.ठिबक सिंचन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडूनही जनजागृती करून इतरत्र शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान मिळत होते. याबाबत यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता कोपरगावच्या शेतकऱ्यांनाही अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान मिळणार आहे असे त्यांनी सांगितले.
महाविकास महाविकास आघाडीच्या शासनाने कोपरगावच्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या अनुदाना पाठोपाठ ठिबकच्या केलेल्या वाढीमुळे शेतकऱ्या समाधान असून महाविकास आघाडी सरकार व आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. व त्यांचा सत्कार केला. ठिबक सिंचनचे राजेश ठोळे, कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र खिलारी, भाऊसाहेब मोरे, बाळासाहेब भंडारी, सुनील शिलेदार, प्रा. अंबादास वडांगळे आदी उपस्थित होते.