जेऊर कुंभारीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – आ. आशुतोष काळे
Jeur will try to solve the water problem of Kumbhari – Aa. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir19 Nov.2021 17.30Pm.
कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारीचे विकासाच्या प्रश्नांबरोबरच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी जेऊर कुंभारी येथील कार्यक्रमात दिली आहे.
आ. आशुतोष काळे म्हणाले की, जेऊर कुंभारी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास होत आहे. तेंव्हा हा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, राहुल रोहमारे, सचिन आव्हाड, बाबुराव थोरात, डॉ. राजेंद्र रोकडे, दिलीप शिंदे, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.