आरोग्य शिबिरांची दुर्बल घटकांसाठी महत्त्वाची भूमिका -आ.आशुतोष काळे

आरोग्य शिबिरांची दुर्बल घटकांसाठी महत्त्वाची भूमिका -आ.आशुतोष काळे

Important role of health camps for the weaker sections – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir19 Nov.2021 17.40Pm.

कोपरगाव: आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेले सर्व रोग निदान शिबीर हा आदर्श व कौतुकास्पद उपक्रम असून अशा शिबीरांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले आरोग्य अबाधित ठेवावे असे आवाहन केले आहे.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये राबविलेल्या ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्वरोग निदान शिबिर आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी शिबिराच्या भेटीप्रसंगी केले .

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, रमेश गवळी, जावेद शेख, धनंजय कहार, अशोक आव्हाटे, कार्तिक सरदार, राजेंद्र आभाळे, आकाश डागा, डॉ. दिपक पगारे, डॉ. प्रशांत सगळगिळे, डॉ. दिपक राजगुरू, डॉ. सागर बागडे, डॉ. पुजा कातकडे, डॉ. अनिरुद्ध उबाळे, प्रसाद ठोंबरे, तुषार कोतकर आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page