ज्यांची पात्रता नाही त्यांनी कोल्हे परिवाराच्या कामावर भाष्यच करू नये- सिद्धार्थ साठे
Those who do not qualify should not comment on the work of the Kolhe family – Siddharth Sathe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir19 Nov.2021 18.00Pm.
कोपरगांव : कोल्हे परिवारावर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या शहर विकासाचा आलेख पडताळून पहावा ज्यांची पात्रता नाही त्यांनी तर यावर भाष्यच करू नये अशा शब्दात भायुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ साठे यांनी विरोधकांनी कोल्हे परिवारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला .
यावेळी सिद्धार्थ साठे यांनी , तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुसज्ज बसस्थानक, पोलिस कार्यालय इमारत, नगरपालिका कार्यालय इमारत, अग्निशमन इमारत, पंचायत समितीची इमारत, सुसज्य ग्रंथालय, यासह शहरातील रस्ते, गटारी, पाणी, आरोग्य, वीज आदि विकास कामांसाठी कोटयावधीचाध आणला, विस्थापीतचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न रहिवाशांना स्वतःचा सातबारा देण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले, असल्याचा पाढा वाचला,
सिद्धार्थ साठे म्हणाले, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शहराच्या पाणी साठवण तलावासाठी कोटयावधी रूपयांच्या जमिनी मिळवुन दिल्या, जमीनधारकांना संजीवनी कारखान्यात नोकऱ्या लावून दिल्या, सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तळ्यातील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली म्हणून तेंव्हा काहींनी यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. बिपीन कोल्हे यांनी पाठपुरावा करून ४२ कोटी ची पाणी वितरण व्यवस्था योजना आणली, त्यासाठी चा सात कोटीचा वाढीव निधी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनीच दिला असल्याचे साठे यांनी सांगितले.
सिद्धार्थ साठे म्हणाले, दुष्काळात संजिवनी कारखान्याचे प्लांट बंद ठेवून कोपरगाव शहर वासियांना पाण्याचे टँकर पुरवले, येसगाव ग्रामपंचायतीतर्फे शहराला पाणी पुरवठा केला, विशेष म्हणजे आजच्या पाच नंबर साठवण तलावाची जी मखलाशी सुरू आहे. त्या पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचा श्री गणेशा तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनीच केला. कारण चार नंबर साठवण तलावाचे काम अर्धवट बंद पडल्यानंतर अनेक प्रयत्न करूनही ते काम सुरू होत नसल्याने शेवटी नवीन पाच नंबर साठवण करण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला, ही वस्तुस्थिती पालिकेत जाऊन पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात साई शताब्दी वर्ष निळवंडे शिर्डी या योजनेची सुरुवात झाली हे पाहताच कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटावा यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव २६० कोटी रुपये खर्चाची बंदिस्त पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन योजना मंजूर करून आणली, श्रीसाई कृपेने शून्य खर्चात एवढी मोठी योजना पदरात पडत असल्याचे पाहून त्यांनी प्रामाणिकपणे पाठपुरावा करून ती योजना यशस्वीरीत्या पदरात पाडून घेतली. दरम्यानच्या काळात निळवंडे पाणी योजनेमुळे पाच नंबर साठवण तलावाकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष याचाच फायदा घेत विरोधकांनी त्यांचाच पाच नंबर साठवण तलावाचा मुद्दा हायजॅक केला व दुसरीकडे श्रेय वादाच्या भितीपोटी मंजूर होवून काम सुरू करण्यासाठी टेंडर प्रसिध्द झालेली निळवंडे योजना न्यायालयात नेऊन कोणी अडकविली याची जाणीव जनतेला आहे. असा टोला साठे यांनी विरोधकांना शेवटी लगावला. .
Post Views:
355

Share this: