तळयाला पिण्याचे तर शेतीला सिंचनाचे पाणी हवे – पद्माकांत कुदळे

तळयाला पिण्याचे तर शेतीला सिंचनाचे पाणी हवे – पद्माकांत कुदळे

The pond needs drinking water while agriculture needs irrigation water – Padmakant Kudale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat20 Nov.2021 13.00Pm.

कोपरगाव : पाण्यासाठी आमच्या जमिनी घेतल्या आणि जमिनीचे पाणीच गेलं,तिकडे आठमाहीचे जायकवाडी बारामाही झाले, आमचे बारामाही कालवे तिन आवर्तनावर आल्याने त्यांना बारामाही कसे म्हणता येईल ? आमचे आठमाही सुद्धा राहिले नाही, बिगर सिंचनाच्या पाण्याला आपण जेवढे महत्व देतातं तेवढचं महत्व शेतीच्या पाण्याला देण्यात यावे थोडक्यात “तळयाला पिण्याचे तर शेतीला सिंचनाचे पाणी हवे” अशी मागणी माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी पद्माकांत कुदळे यांनी शनिवारी (२०) रोजी सकाळी धनश्री पतसंस्था सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

पद्माकांत कुदळे म्हणाले, मेंढेगिरी च्या अहवालाप्रमाणे जायकवाडीमध्ये ३७ टक्के पाणी झाल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो चे पाणी गोदावरी डाव्या- उजव्या कालव्यात देण्यास हरकत नाही, असे असतांना ६७ ते ७० टक्के झाल्यानंतरची दिशाभूल केली गेली, त्यामुळे सिंचनाच्या पाण्यावर  प्रश्नचिन्ह निर्माण झाले, जायकवाडीसह गोदावरी खोऱ्यातील धरणे भरलेली आहेत. तेंव्हा नियम कायद्याप्रमाणे लाभक्षेत्रातील क्षेत्रिय परिस्थितीचा आढावा घेऊन, संभाव्य रब्बी व उन्हाळा हंगामातील आवर्तन संख्या व नियोजित आवर्तनाच्या तारखा सर्व संमतीने २५ ऑक्‍टोबरपर्यंत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करावयास हवे होते. पण बैठक घेतली जात नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे , गोदावरी डाव्या उजव्या कालव्यात पाणी देताना हेळसांड होते. नियोजन चुकविले जाते, अधिकारी याचे समाधानकारक उत्तर देत नाही. हे शोधायचे आहे. हा राजकीय नव्हे तर शेतकऱ्याच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न आहे,

यावेळी पद्माकांत कुदळे यांनी सांगितले कि, शेतकऱ्यांना वेळेवर पाणी दिले जात नाही. किंवा पिक काढणीनंतर दिले जाते , संबधीत विभाग पाणीपट्टी वारंवार वाढवत चालले आहे. पाण्याची शाश्‍वती नसल्याने व पाणीपट्टी तिप्पट वाढली असून पाणीपट्टीत आणखी ३०% वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. शेतकरी ७ नंबर फॉर्म भरत नाही, हे कशासाठी? शेतकऱ्यांनी पाणी घेऊ नये याकरीता आहे कि काय? हे पाणी दुसरीकडे देता यावे यासाठी तर हे षड्यंत्र नाही ना ? असा सवाल त्यांनी केला.

सोमनाथ चांदगुडे म्हणाले, गोदावरी कालवे क्षेत्रात दोन पालकमंत्री, दोन खासदार, सात आमदार असतांनाही वर्षानुवर्ष गोदावरी कालव्यावरअन्याय का होतो ? याचे कारण या सर्वांमध्ये समन्वय नाही, अधिकारी खाजगीत म्हणतात तुमच्या नेत्यात एकसूत्रता नाही. तसेही नेते सरकारशी पंगा घेणार नाहीत, त्यांना त्यांच्या संस्था टिकवायचा आहेत, २००५ च्या समन्यायी कायद्याचे नियम कालबाह्य झाले आहेत. ते आता परिस्थितीनुरूप विधानसभेत मांडून बदलण्याची गरज आहे. एम. डब्ल्यू. आर. आर. बरखास्त करून शासन, प्रशासन ते थेट शेतकरी  अशी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. असे त्यांनी सांगितले,

तुषार विद्वांस म्हणाले, कायद्याप्रमाणे कालवा समिती बैठक बंधनकारक असताना बैठकीचे नियोजन केले जात नाही. गरज नसताना पाणी सोडले जाते, मग शेतकरी मागणी कशी करतील ? आवर्तनामध्ये आठ दिवसाचे अंतर असावे पण तसे होत नाही. पाणी किती व कधी मिळणार याची शाश्वती नाही ? त्यामुळे आता सरकारनेच यापुढे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम व पाण्याचे धोरण कळवावे अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेचे प्रवीण शिंदे म्हणाले, दारणा धरणाची निर्मिती अवर्षणग्रस्त तालुक्यामध्ये सिंचन  निर्मिती या उद्देशाने झाली. त्यावर मोठया प्रमाणात बिगर सिंचन औद्योगिक वापराचे आरक्षण टाकण्यात आले.  मुळ निर्मितीच्या उद्देशावर पाटबंधारे खाते हरताळ फासीत आहे. एकीकडे ६५ टक्के लॉसेस दाखवून शेतीला केवळ ३५ टक्के पाणी पुरविले जाते, मग हे पाणी मुरते कुठे? पाण्यासाठी आमच्या जमिनी घेतल्या ब्लॉक रद्द झालेले नाहीत, केवळ स्थगित केले आहे. परंतु  अज्ञानापोटी यावर आज कोणीही बोलण्यास तयार नाही. यापुढे लवकरच  ब्लॉकच्या पाणी हक्कासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.तर आगामी काळात पाणी प्रश्‍नावर तिव्र लढा देण्याचे संकेत कुदळे, विद्वांस,शिंदे व चांदगुडे यांनी शेवटी दिला आहे.

चौकट

आमच्या या आंदोलनाला राजकारणाच्या  तराजूत तोलू नका, शेतकरी वाचला पाहिजे शेतकरी वाचला, तर व्यापार वाचेल, व्यापार वाचला तर शहराचे अर्थकारण टिकेल अन्यथा सगळे ओसाड होईल. तेंव्हा जनरेटा देण्यासाठी पत्रकारांनी आमची पाणदेवता किंवा नेते व्हावे असे आवाहन पद्माकांत कुदळे यांनी शेवटी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page