कोपरगावच्या नातवाने कौन बनेगा करोडपतीमध्ये जिंकले ५० लाख
Kopargaon’s grandson Kaun Banega won Rs 50 lakh in crorepati
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat20 Nov.2021 17.00Pm.
कोपरगाव : सोनी टीव्हीवरील “कौन बनेगा करोडपती” या सर्वात मोठ्या क्विझ रिअलिटी शोमध्ये स्टुडंट स्पेशल विकमध्ये स्पर्धेमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोपरगाव चा नातू सध्या लखनऊला रहात असलेल्या पंधरा वर्षाचा मानस अनिल गायकवाड हा एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचला खरा, मात्र त्याचेकडे एकही लाईफलाईन शिल्लक न राहिल्याने व प्रश्न किचकट असल्याने तो ५० लाख रुपये जिंकून खेळ सोडून दिला.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्याच्या खात्यात पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले आहे. याचा आनंद त्याचे वडील डॉ. अनिल राजश्री व बहिण तेजश्री व नातेवाईकांचा गगनात मावेनासा झाला. कोपरगावच्या नातवाने संपूर्ण विश्वात कोपरगावचे नाव केल्याने व टीव्हीवर झळकवलयाने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन या १५ वर्षाच्या मानसच्या इंग्रजी, हिंदी, भाषेतील उत्तरे ऐकून अचंबित व प्रभावित झाले. मानस हा दिल्ली पब्लिक स्कूल जानकीपुरम शाखेत दहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील डॉ. अनिल निळकंठ गायकवाड हे (सी. डी.आर.आई.) सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सीनियर प्रिन्सिपल शास्त्रज्ञ म्हणून २० वर्षापासून कार्यरत आहेत, तर आई राजश्री गृहिणी आहे. नीळकंठ रामचंद्र गायकवाड (सध्या राहणार जळगाव) यांचा नातू आहे. निळकंठ गायकवाड यांनी कोपरगाव तालुक्यातील शिवशंकर विद्यालयात शिक्षक म्हणून, त्यानंतर जळगाव, धुळे, नाशिक येथे शिक्षणाधिकारी, विभागीय सचिव, एस. एस. सी. बोर्ड नाशिक आदी पदांवर काम केले होते. सप्टेंबर मध्ये घेतलेल्या प्रतियोगीते मध्ये देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. अंतिम परीक्षेत सहाशे विद्यार्थ्यांची निवड करून त्या सर्वांना मुंबईत बोलावण्यात आले होते. त्यात केवळ दहा विद्यार्थ्यात तो निवडला गेला, त्या दहा विद्यार्थ्यांमध्ये फास्टेट सिंगर फर्स्ट चा मुकाबला होऊन मानस त्यात प्रथम क्रमांकाने निवडला गेला, हे त्याचे व आमचे परम भाग्यच आहे.असे दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्य निरू भास्कर यांनी सांगितले. मानस याने आमच्या शाळेचे तसेच लखनऊ शहराचे नाव संपूर्ण जगभर उज्वल केले असून त्याच्या यशामुळे आम्ही सर्वजण भारावलो गेलो आहोत.
राहाता येथील ज्ञानेश्वर गायकवाड हे डॉ. अनिल यांचे काका आहेत. कोपरगावची मान उंचावली आहे. याबाबत त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. माझे आजोबा आई-वडील व माझे प्राचार्य शिक्षक गुरुजनवर्ग यांच्या शिकवनुकी मुळेच मी आज यशाच्या शिखरावर पोहोचू शकलो, विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करत आई वडीलांचे नाव उज्वल करावे अशा शब्दात मानस गायकवाड याने विद्यार्थ्यांना संदेश दिला.
चौकट
मानस चार वर्षाचा असताना युरोप स्वित्झर्लंड जर्मनी चेक रिपब्लिक आदी देश तसेच भारतात राजस्थान उत्तराखंड ऐतिहासिक ठिकाणी त्या त्या भागाचा त्याचा चांगला अभ्यास आहे असे त्याचे वडील डॉ.अनिल गायकवाड यांनी सांगितले.





