पुणतांब्याच्या कार्तिक स्वामी यात्रेत मोरपिसांची लाखोंची उलाढाल
Turnover of lakhs of peacocks in Kartik Swami Yatra of Punatamba
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 20 Nov.2021 17.20Pm.
कोपरगाव : दक्षिणगंगा गोदावरी किनारी असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र पुणतांबा येथील कार्तिक स्वामी यात्रेत मोर पिसांची लाखो रुपयांची उलढाल झाली. कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांची गर्दी कमीच आहे, गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी ही यात्रा भरल्याने थोडाफार भाविकांना व यात्रेकरूंना दिलासा मिळाला .
मोर पिसाचे परवानाधारक विक्रेते व प्रसाद ग्रंथ भांडारचे संचालक जयप्रकाश सोमवंशी माहिती देताना म्हणाले, आग्रा राजस्थान अहमदाबाद आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोर आहेत. या भागातील आदिवासी मंडळी ही पिसे वर्षभर गोळा करण्याची प्रक्रिया करतात, तेथून होलसेल दराने आम्ही ते खरेदी करून पुणतांबा व श्री क्षेत्र देवगड येथे दरवर्षी त्याची विक्री करतो.
हिंदू धर्मात मोराच्या पंखाला मोठं विशेष महत्व आहे , भगवान कृष्णाच्या मुकुटावर मोर पंखाला प्रमुख स्थान आहे. विना मोर पंख भगवान कृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. त्याशिवाय, भगवान शिवांचे पुत्र कार्तिकेय स्वामी, देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे. इतकंच नाही पुराणकाळात तर अनेक ग्रंथाची निर्मिती मोर पंखाने लिहिण्यात झाली आहे. वास्तू शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात मोर पंखाच्या महत्त्वाबाबत सांगण्यात आलं आहे अनेक लोक मोर पंखाचा वापर घराला सजवण्यासाठी करतात. मोर पंख दिसायला अत्यंत सुदंर असतं जे आपलं मन मोहून घेतं. हे मोराचे पंख घरात ठेवणे अत्यंत शुभकारक चांगलं असतं. वास्तू शास्त्रानुसार घरात मोराचा पंख ठेवणे शुभ मानलं जाते. मोर पंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात. वास्तूनुसार, मोर पंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. मान्यता आहे की मोराचा पंख लावल्याने घरात सुख-समृद्धि येते. त्याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही पैशे ठेवता तिथे एक मोराचा पंख ठेवले जाते असं केल्याने पैशांची समस्या उद्भवत नाही.आपण नेहमीच ऐकतो की मोराचा पंख पुस्तकात ठेवणे चांगलं असतं. वास्तू शास्त्रानुसार, ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात नसते त्यांनी आपल्या पुस्तकात मोराचा पंख ठेवावा, असं केल्याने एकग्रता वाढते .
वास्तू शास्त्रात सांगण्यात आलं आहे की घराच्या द्वारावर मोर पंख लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहाते. जर पती-पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर घराच्या बेडरुममध्ये मोर पंखाचा फोटो लावातात. त्याशिवाय मोर पंखाने घरातील त्रास दूर होईल, त्यासाठी तीन मोर पंखाला काळ्या धाग्यात बांधून आणि मग सुपारीच्या काही तुकड्यांवर पाणी शिंपडताना २१ वेळा “ओम शनिश्चराय नम:” या मंत्राचा जप करतात. अशी मोरपिसांची आख्यायिका आहे. भगवान कार्तिक स्वामी यांच्या मूर्तीला स्पर्श करून मोरपीस देव घरात ठेवण्याची प्रथा आहे त्यामुळे आर्थिक सुबत्ता सुधारते अशी भावना आहे