कोपरगाव शहराच्या विकासासाठी १२ कोटीचा निधी दिला-आ.आशुतोष काळे

कोपरगाव शहराच्या विकासासाठी १२ कोटीचा निधी दिला-आ.आशुतोष काळे

12 crore for development of Kopargaon city – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat20 Nov.2021 17.30Pm.

 कोपरगाव : शहराच्या विकासासाठी १२ कोटीचा निधी दिला असून नगरपरिषदेला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी शुक्रवारी (१९) रोजी शहरातील एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांच्या हस्ते शहरातील विविध कामांची सुरुवात करण्यात आली.

   आ. काळे म्हणाले, शहरातील विकास कामासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनातुन मला साथ दिली, ५ नं. साठवण तलावाच्या पुढील कामासाठी महाविकास आघाडीकडून निधी मिळवू, हे काम लवकरच पूर्ण करू, पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त राहावे. मात्र त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी कोपरगाव शहराला कसा मिळविता येईल यासाठी माझे राजकीय वजन वापरून शहर विकासाचे सर्व प्रश्न सोडविणार आहे. ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखविला तोच विश्वास शहर विकासाला गती देण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत दाखवा. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.          

    यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,  सुनिल गंगुले,  बोरावके, मंदार पहाडे,  सौ. प्रतिभा शिलेदार,  मेहमूद  सय्यद, राजेंद्र वाकचौरे,  कलविंदरसिंग डडीयाल, रमेश गवळी, फकीर कुरेशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी,सुधीर डागा, प्रकाश बंब, दिलीप गवांदे, सुनील बोरा,  अॅड.विजय गवांदे, राजेंद्र  फुलफगर, सचिन मुंदडा, आर. टी. पटेल, आकाश डागा, अमोल बोगा, रोशन डागा, यश लोहाडे, जय बोरा, संकेत ठोळे, मुकुंद भुतडा,  प्रकाश दुशिंग, विजय नागरे, दिनेश संत,अजहर शेख, डॉ. भोसले, गोखले ताई, रंजना पटेल,भावना गवांदे, सीमा कंगले, भाग्यश्री बोरुडे, राजेंद्र जोशी,बाला गंगुले,  धनंजय कहार, प्रशांत वाबळे, दिनेश संत, ऋषिकेश खैरनार, नारायण लांडगे, शारदा दुशिंग, मौलाना रियाज खान, मौलाना आसिफ, मौलाना बशीर हाफिज, मौलाना शपिक, मौलाना अनिस, शकील पटेल, अल्ताफ पटेल, इरफान तांबोळी, जावेद शेख, फिरोज पठाण, जुनेद शेख,  इम्तियाज अत्तार, साजिद शेख, फादर विशाल त्रिभुवन, फादर भोसले, दिनेश पवार, किशोर डोखे, किरण बागुल,  विजय शिंदे, सौ.मायादेवी खरे, सौ. मनीषा डोखे, सौ. संगीता पवार, ताई साळवे, सौ. मीनाक्षी शिंदे, सौ. चंद्रभागा हिंगे, सौ. ज्योती बागुल,  राणीताई पवार, राजेंद्र खैरनार,  चांदभाई पठाण, आप्पा आरख,  बाबुराव पवार, नितीन शेलार, मधुकर पवार, अक्षय पवार,सोमेश आढाव, मिलिंद सरोवर,किरण बागुल,  बाळासाहेब दहे, निलेश रुईकर, रमेश कुहीरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                    

Leave a Reply

You cannot copy content of this page