राजगृह प्रकरणी सी.बी.आय. चौकशी व कठोर कारवाईची मागणी – दिपक गायकवाड
वृत्तवेध ऑनलाईन 12 July 2020
कोपरगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता असून अशा प्रकारचे हल्ले आता सहन केले जाणार नाही. राजगृह या निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या माथेफिरिंची सी.बी.आय. मार्फत चौकशी करावी व या हल्ल्या मागील सूत्रधार व समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दिपक गायकवाड यांनी केली आहे.
रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदास आठवले यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश सचिव दिपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधीक्षक,शिर्डी विभाग यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती व वास्तूचा ठेवा असणारे मुंबईतील राजगृह निवास्थान देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असून या राजगृहावर तोडफोड करण्यात आलेल्या घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
मुंबईतील राजगृह या निवासस्थानी दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या माथेफिरू समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच राजगृह ला कायम स्वरुपी चोवीस तास पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर प्रसंगी जिल्हा नेते रामराव गायकवाड, शंकर त्रिभुवन,शिर्डी शहर अध्यक्ष कैलासराव शेजवळ,बाळासाहेब कसबे,मुन्नाभाई शेख, वाल्मीक गोटीस,इनामदार भैय्या भाई, शाम कुलकर्णी व रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते…





