सिमेंटचे रस्ते दीर्घकाल टिकणारे.. त्यावर डांबरीकरण केल्यास अनंतकाल टिकणारे

सिमेंटचे रस्ते दीर्घकाल टिकणारे.. त्यावर डांबरीकरण केल्यास अनंतकाल टिकणारे

Cement roads are long lasting .. If they are tarred,Asphalting they will last forever

कोपरगाव नगरपालिकेचा रस्ता कामाचा नवा सिद्धांतNew Principle of Kopargaon Municipality Road Work

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun21 Nov.2021 17.40Pm.

कोपरगाव : निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे डांबरी रस्त्यांवर लवकर खड्डे पडतात व खड्डे पडल्यानंतर ते वाढतही जातात. त्यामुळे डांबरी रस्त्यांचे आयुर्मान तीन-चार वर्षांचे असते. सिमेंटचे रस्ते दीर्घकाळ टिकतात. त्यावर खड्डे पडत नाहीत. सिमेंटचे रस्ते जर दीर्घकाल टिकणारे असतात तर त्यावर डांबरीकरण केल्यास अनंतकाल टिकणारे होतील, या थेअरिचा ( नवा सिद्धांत) अभ्यास करून कोपरगाव नगरपालिकेने प्रभाग क्रमांक १० मध्ये गुरुवारी (१८) रोजी थेट सिमेंटच्या रस्त्यावरच थेट डांबरीकरण सुरू केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याबाबत तक्रार करून संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व खर्ची पडलेल्या पैशाचे वसुली करावी अशी मागणी केली आहे. आणि ती मागणी रास्तच आहे.

सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण

डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते करणे अधिक खर्चिक असले, तरी ते दीर्घकाल टिकणारे व मजबूत असतात. त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे सिमेंट कॉँक्रिटचे रस्ते केले जातात.

रस्त्यासाठी किती निधी उपलब्ध आहे, त्यासाठीची मंजुरी; तसेच नगरसेवकांकडे किती तरतूद आहे, हे पाहूनच रस्ता सिमेंटचा, की डांबरी याचा निर्णय घेतला जातो.

नगरपालिका रस्त्यांची कामे कंत्राटदारांकडून केली जातात. त्यांच्यावर पालिकेचे नियंत्रण पाहिजे असते. पण संबंधीत विभागाचे अभियंते, अधिकारी कामावर लक्ष ठेवतांना दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने होत नाहीत. याचा सरळ अर्थ अधिकारी कार्यालयात बसून फक्त टेंडर प्रसिद्धी करण्याचे व टेंडर देण्याचे काम करतात असा होतो.
२८ कामामुळे शहराचा विकास होऊन नागरिकांची रस्त्यामुळे होणारी हेळसांड थांबणार असल्याचा डांगोरा पिटला गेला, परंतु कामे सुरू करतांना पाऊस, पाणी, वातावरण, गुणवत्ता व दर्जा याचा कुठलाही विधिनिषेध पाळला जात नसल्याचे संजय काळे यांनी केलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. अशी कामे होतात कशी ? पालिकेचा काही धाक आहे किंवा नाही ? खरे तर याचे उत्तर आता कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दिले पाहिजे .

Leave a Reply

You cannot copy content of this page