नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना – संजय भनसाळी
Be a job giver rather than a job – Sanjay Bhansali
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon22 Nov.2021 18.00Pm.
कोपरगांव: कोणत्याही विद्या शाखेची पदवी संपादन करीत असतानाच विद्यार्थ्यांनी उद्योग उभारणी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतः मधिल कौशल्ये विकसित करावी. याद्वारे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी मिळेल. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे बना, असा सल्ला कोपरगांव येथिल प्रसिध्द उद्योजक संजय भनसाळी संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये उद्योजकता विकास कक्ष स्थापनाप्रसंगी केले अध्यक्षस्थानी विश्वस्त सुमित कोल्हे होते.
प्रसंगी शैक्षणिक संचालक डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. एस.बी. दहिकर, कक्षाचे प्रमुख प्रा. रितेश तोंडसे व्यासपीठावर उपस्थित होते. संजय भनसाळी म्हणाले, संजीवनी शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापन विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी नवनविन उपक्रमांची अंमलबजावणी करते. याचाच एक भाग म्हणुन उद्योजकता विकास कक्ष स्थापनेचा निर्णय स्वागतार्ह आहे. यातून अशा भविष्यात उद्योजक निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुमित कोल्हे म्हणाले की, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपुर टॅलेंट आणि कष्ट करण्याची क्षमता असते, त्यांना दिशा व योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते यशस्वी होवु शकतात, हे संजीवनीच्याच विविध शाखांमधुन बाहेर पडलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी सिध्द केले आहे. या कक्षाच्या निर्मितीमुळे आता विद्यार्थ्यांना विध्यार्थ्यांना भारत व राज्य सरकारच्या उद्योग निर्मिती व तो वाढविण्यासाठी काय योजना आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, अर्थ सहाय्य कसे उभारावे, इत्यादी अनेक बाबींची माहिती मिळणार आहे. माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांची ग्रामिण विद्यार्थी नोकरदार अथवा उद्योजक कसे होतील ही कायमची तळमळ असते. कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे हे सुध्दा विद्यार्थ्यांना स्वतःच्या हिमतीवर उभे करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आंचल नारंग, कल्याणी ठोंबरे पुनम होन व मोनाली सोनवणे, नम्रता देवकर, संस्कुती मोरे, तेजस्वीनी गायकवाड, आणि श्रध्दा धाडीवाल यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसांनी गौरविण्यात आले.
तसेच प्रा. मुकूल बरवंट, प्रा. विजय सोमासे व प्रा. निलेश भालेराव डाॅ. सरीता भुतडा व डाॅ. मुक्ता शिंदे यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. पलक मखिजा तर प्रा. लिना मंटाला यांनी आभार मानले.