वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना प्रश्न सोडविणार – आ. आशुतोष काळे
Wari-Kanhegaon joint water supply scheme will solve the problem – Mla. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon22 Nov.2021 18.30Pm.
कोपरगाव : काही वर्षापासून प्रलंबित असलेला वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी वारी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते ३ कोटी ३० लाख रुपयांच्या कामाची सुरुवात करण्यात आली .
आ. आशुतोष काळे म्हणाले की, पिण्याचे, शेतीचे पाणी,रस्ते, वीजेचे प्रश्न, तीर्थक्षेत्र विकास व मुलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे. रस्ते, पूल आणि पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळवण्यात फार मोठा फरक आहे. पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवितांना अनेक बाबी तपासल्या जातात. यामध्ये पाणी पुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे का? ग्रामपंचायतीची स्वमालकीची जागा आहे का? पाण्याचा स्त्रोत आदी गोष्टी महत्वाच्या आहेत. तरीदेखील माता, भगिनींची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी या पंचवार्षिक मध्येच ही योजना पूर्ण करण्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर माजी आमदार अशोकराव काळे त्याच्याकडून वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पूर्ण व्हावा हि अपेक्षा होती. त्यांनी या पुलाबाबत प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पाठविले. परंतु दुर्दैवाने २०१४ ला सत्ता बदल झाल्यामुळे पुढील कार्यवाही झाली नाही. परंतु हा पूल देखील आपण पूर्ण करणार असून वारी-कान्हेगाव हा रस्ता, कोळ नदीवरील पुल, २५१५ योजनेतून वारीच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्ता, . एमडीआर २०३ या रस्त्यासाठी देखील निधी उपलब्ध होवून वारीचा दळणवळणाच्या अडचणी दूर होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, दिलीप बोरनारे, दिलीप आबक, बबनराव सांगळे, लक्ष्मणराव चौधरी, नामदेवराव जाधव, सरपंच सतिश काकडे, उपसरपंच विशाल गोर्डे, नानासाहेब टेके, देवचंद कडेकर, रंगनाथ काजळे, रमेश काळे, बंकटराव जगताप, ताराचंद सत्राळकर, शरद जोशी, अशोक निळे, राजेंद्र गायकवाड, अशोकराव कानडे, गोरक्षनाथ टेके, रमेश कोकाटे, दत्तात्रय शिरसाठ, बाबूशेठ कलंत्री, भास्करराव आदमाने, संदीप जाधव, रमेश टेके, दिलीप देशमुख, दिलीप गायकवाड, रावसाहेब टेके, सचिन टेके, अशोक टेके, विजय गायकवाड, संजय जाधव, वाल्मीक काजळे, जनार्दन जगताप, नवनाथ जाधव, प्रमोद सांगळे, बापू कडेकर, अनिल काजळे, प्रकाश चौधरी, दिनकर काजळे, दिपक भाकरे, कडूबा खिलारी, गणेश गुंजाळ, महेश भोकरे, विवेक टेके, गोपाल कारवा, सुखदेव मुसळे, राजेंद्र पांडे, गोरखज लांडगे, प्रकाश गोर्डे, मदनशेठ काबरा, पाळंदे सर, गोकुळ मेहेर, कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ गीते, येवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, उपअभियंता उत्तम पवार, ग्रामसेवक वारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट :- पुलासाठी कुणी तरी निवेदन दिल्याचे ऐकायला मिळाले. मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना निवेदन द्यायची होती आणि पुलासाठी निधी देखील आणायचा होता. मात्र त्यावेळी निवेदन दिली नाही आणि निधी देखील आणला नाही. आता मात्र सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण सुचत असून आपण करणाऱ्या कामाबाबत निवेदन द्यायचे काम सध्या जोरात सुरु आहे – आ. आशुतोष काळे.





