समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार गायत्री कंपनीने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात -आ. आशुतोष काळे
Gayatri Company, thecontractor of Samrudhi Highway, should solve the problems of the farmers. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu23 Nov.2021 18.00Pm.
कोपरगाव : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे तालुक्यातील रस्त्यांची व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार गायत्री कंपनीने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी गायत्री कंपनीअधिकारी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांना तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत केल्या आहेत.
यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या लगत सर्व्हिस रोड तयार करावे,समृद्धी महामार्गाच्या डक्टचा (महामार्गाखालून जाणारा भूमिगत रस्ता) आकार वाढवावा, पाईपलाईनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी वाहतूक वाहतुकीमुळे दूरावस्था झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करावे, भविष्यात प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, राहुल रोहमारे, दाणे पाटील, विठ्ठल जावळे, सचिन आव्हाड, दिपक रोहोम, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, सुमेध वैद्य, दिपक बांगर, महेश टी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे एस.के.बावा, नासिर शेख आदी उपस्थित होते.





