शहराच्या नव्या भागासाठी भूमिगत गटारीचे प्रस्ताव करा-आ.आशुतोष काळे

शहराच्या नव्या भागासाठी भूमिगत गटारीचे प्रस्ताव करा-आ.आशुतोष काळे

Propose an underground sewer for a new part of the city – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu23 Nov.2021 18.20Pm.

 कोपरगाव : कोपरगाव शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात भूमिगत गटारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती द्या, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, दिपक बडगुजर, साबळे, गुरसळ, पद्माकांत कुदळे, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, मेहमुद सय्यद, सुनील शिलेदार, फकीर कुरेशी, दिनकर खरे, कृष्णा आढाव, सचिन गवारे, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

आ. आशुतोष काळे म्हणाले, कोरोना थांबला असला तरी वातावरण बदलानुसार होणारे साथीचे आजार व उघड्या गटारींमुळे वाढणारी रोगराई चिंतेचा विषय ठरू शकते. त्यासाठी भूमिगत गटारी हि काळाची गरज होऊन बसली आहे. त्यासाठी शहर व हद्दवाढ झालेल्या भागातील भूमिगत गटारीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा.मी सदर प्रस्तावांना महाविकास आघाडी सरकारकडून मंजुरी मिळवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page