ठेकेदारांनो दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करा आ.आशुतोष काळे
Contractors complete quality work on time – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu23 Nov.2021 18.30Pm.
कोपरगाव: पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात विविध विकासकामे देण्यात आली आहे. मात्र अनेक ठेकेदारांकडून हि विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही. तेंव्हा ठेकेदारांनो दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समिती येथे झालेल्या ठेकेदारांच्या बैठकीत ठेकेदारांना दिल्या आहे.
यावेळी सभापती सौ.पोर्णिमा जगधने, सभापती अर्जुनराव काळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, कारभारी आगवन, राहुल रोहमारे, काळे कारखाना उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सुनील शिंदे, रोहिदास होन, राहुल जगधने, दिलीप दाणे, प्रशांत वाबळे, सांडूभाई शेख, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तमराव पवार, सर्व शाखा अभियंता तसेच ठेकेदार उपस्थित होते.





